Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानपरिषद | खडसे-शेट्टींसह आठ राज्यपाल कोट्यातील सदस्यांच्या नियुक्तीला हायकोर्टात आव्हान

राज्यपालांकडे विधानपरिषदेसाठी शिफारस केलेल्या आठ जणांच्या नियुक्तीला या अर्जाद्वारे विरोध केला आहे.

विधानपरिषद | खडसे-शेट्टींसह आठ राज्यपाल कोट्यातील सदस्यांच्या नियुक्तीला हायकोर्टात आव्हान
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 3:38 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्यासह विधानपरिषदेवरील आठ राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या नियुक्तीला (Governor Elected Vidhan Parishad MLC) आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कला किंवा सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या नियुक्तीचे निकष असताना राजकीय नेत्यांची वर्णी लावल्याने दोघा सामाजिक कार्यकर्त्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. (Eknath Khadse Raju Shetty and 6 other Governor Elected Vidhan Parishad MLC challenged in Bombay HC)

एकनाथ खडसे, राजू शेट्टी यांच्यासह राजू भिंगे, रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुजफ्फर हुसेन, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी या आठ जणांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आलं आहे. खडसे-शेट्टी यांच्यासह आठही जणांची राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधानपरिषदेवर नियुक्तीला करण्यालाही या याचिकेतून विरोध करण्यात आला आहे.

राज्यपालांना 12 जणांना विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त करण्याचा अधिकार आहे. मात्र या नियुक्त्या करताना शिक्षण, कला, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची नियुक्ती करावी, अशी प्रथा आहे. परंतु या क्षेत्रातील व्यक्तींची निवड न करता राजकीय व्यक्तींची नियुक्ती केली जात असते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते दिलीप आवळे आणि शिवाजी पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली.

या याचिकेच्या अनुषंगाने याचिकाकर्त्यांचे वकील सतीश तळेकर यांनी काल झालेल्या सुनावणीच्या वेळी हायकोर्टात एक नवा अर्ज सादर केला. राज्य सरकारने राज्यपालांकडे शिफारस केलेल्या 12 जणांपैकी आठ जणांच्या नियुक्तीला या अर्जाद्वारे विरोध केला आहे. आठ जणांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आलं आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, गायक आनंद शिंदे, कवी अनिरुद्ध वनकर, व्याख्याते नितीन बानुगडे पाटील हे कला, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आहेत. मात्र भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे, राजू शेट्टी यांच्यासह राजू भिंगे, रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुजफ्फर हुसेन, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी हे आठ जण राजकीय नेते असल्याने त्यांच्या नियुक्तीला आव्हान देण्यात आलं आहे.

12 सदस्यांमध्ये कोणाची नावं?

काँग्रेस

1) सचिन सावंत – सहकार आणि समाजसेवा 2) रजनी पाटील – सहकार आणि समाजसेवा 3) मुजफ्फर हुसैन – समाजसेवा 4) अनिरुद्ध वनकर – कला

(Eknath Khadse Raju Shetty and 6 other Governor Elected Vidhan Parishad MLC challenged in Bombay HC)

राष्ट्रवादी काँग्रेस

1) एकनाथ खडसे – सहकार आणि समाजसेवा 2) राजू शेट्टी – सहकार आणि समाजसेवा 3) यशपाल भिंगे – साहित्य 4) आनंद शिंदे – कला

शिवसेना

1) उर्मिला मातोंडकर – कला 2) नितीन बानगुडे पाटील – 3) विजय करंजकर – 4) चंद्रकांत रघुवंशी –

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेसाठी शिफारस केलेली 12 नावे लवकर जाहीर करा, अन्यथा… : पृथ्वीराज चव्हाण

राज्यपाल नियुक्त 12 जागांचा तिढा वाढला, ठाकरे सरकारकडून 15 दिवसांच्या मुदतीची शिफारस

विधानपरिषद : राष्ट्रवादीच्या यादीत खडसे, शेट्टी, आनंद शिंदेंचं नाव, शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानुगडे

(Eknath Khadse Raju Shetty and 6 other Governor Elected Vidhan Parishad MLC challenged in Bombay HC)

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.