फाजील नेतृत्वामुळे भाजपचा पराभव, मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही, खडसेंचा हल्लाबोल

भाजपात हम करे सो कायदा होता, म्हणून हा पराभव झाला" असा घणाघात एकनाथ खडसेंनी केला.

फाजील नेतृत्वामुळे भाजपचा पराभव, मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही, खडसेंचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 3:44 PM

जळगाव : “विधानपरिषदेवरील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपचा पराभव हा फाजिल नेतृत्वामुळे झाला. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, ही भावना अजून गेली नाही” अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल चढवला. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाचपैकी एकाही जागेवर भाजपला वर्चस्व मिळवता आलं नाही. (Eknath Khadse slams Devendra Fadnavis for BJP’s defeat in Graduate and Teachers constituency Election Results)

“अहम्-पणाचा पराभव झाला. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही. पुणे आणि नागपूरसारखा परंपरागत मतदारसंघ भाजपच्या हातून गेला. लोकांचा आता भारतीय जनता पार्टीवरील विश्वास कमी होत चालला आहे आणि महाविकास आघाडीवर विश्वास वाढला आहे” अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी ”टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.

“भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील नेहमी म्हणतात, कोणी बाहेर गेल्यावर फरक पडत नाही, आम्ही हिमालयात जाऊन बसू, यांच्या नुसत्या गप्पा असतात” असं म्हणत खडसेंनी चंद्रकांत पाटलांनाही टोला लगावला.

“महाविकास आघाडीच्या एकीचे हे प्रदर्शन झाले आहे. भाजपचे नेतृत्व कमी झाले आहे. पक्षात हम करे सो कायदा होता, म्हणून हा पराभव झाला” असा घणाघातही खडसेंनी केला.

फडणवीसांची टोलेबाजी

“ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा निवडून आली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना फायदा झाला आहे. या निकालांनंतर जसं आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे, तसंच ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा येत नाही, त्यामुळे त्यांनीही आत्मचिंतन करावं” असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला.

(Eknath Khadse slams Devendra Fadnavis for BJP’s defeat in Graduate and Teachers constituency Election Results)

महत्त्वाचे निकाल

पुणे पदवीधर – अरुण लाड (राष्ट्रवादी) – विजयी पुणे शिक्षक – जयंत आसगावकर (काँग्रेस) – आघाडीवर नागपूर पदवीधर – अभिजीत वंजारी (काँग्रेस) – आघाडीवर औरंगाबाद पदवीधर – सतीश चव्हाण (राष्ट्रवादी) – विजयी अमरावती शिक्षक – किरण सरनाईक (अपक्ष) – आघाडीवर धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य – अमरिश पटेल (भाजप) – विजयी

संबंधित बातम्या :

भाजप बेसावध, ससा-कासवाच्या गोष्टीप्रमाणे पदवीधरमध्ये जिंकून येण्याचा आभास : मुनगंटीवार

चंद्रकांतदादांमुळे माझा विजय सोपा, पुणे पदवीधर मतदारसंघ खेचून आणताच राष्ट्रवादीच्या अरुण लाड यांचा टोला

(Eknath Khadse slams Devendra Fadnavis for BJP’s defeat in Graduate and Teachers constituency Election Results)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.