Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ, सरकार स्थापन करायला तळमळताहेत; खडसेंची टीका

सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी ते आजही तळमळत आहेत. (eknath khadse taunt devendra fadnavis over government forming with ajit pawar)

देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ, सरकार स्थापन करायला तळमळताहेत; खडसेंची टीका
eknath khadse
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 11:58 AM

मुंबई: सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी ते आजही तळमळत आहेत, अशी कोपरखळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना लगावली आहे. (eknath khadse taunt devendra fadnavis over government forming with ajit pawar)

एकनाथ खडसे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही कोपरखळी लगावली आहे. देवेंद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहेत. सत्तेत आलं पाहिजे म्हणून त्यांनी अजित पवारांसोबत सत्ता स्थापन केली. आजही सरकार स्थापन करण्याची त्यांची तळमळ दिसत आहे, असा चिमटा खडसे यांनी काढला.

विरोधक वाट बघतच राहतील

महाविकास आघाडी सरकार जन्माला आल्यापासून हे सरकार पडणार असल्याचं चंद्रकांत पाटील सांगत आहेत. सरकार पडणार असल्याच्या चंद्रकांतदादांनी दोन तारखाही दिल्या. फडणवीसांनीही तारीख निश्चित केली होती. पण काही होत नाही. सरकार काही जात नाही. विरोधक वाट बघत आहेत. ते वाटच बघत राहतील, असा टोला त्यांनी लगावला. खरं सांगायचं तर राज्यातील आघाडी सरकार दिवसे न् दिवस मजबूत होत आहे. भाजपधील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. नाराजांची संख्या वाढू नये म्हणून आपलं सरकार येणार असं आमदारांना सांगून वेळ मारून नेली जात आहे, असा दावाही त्यांनी केला.

चूक मान्य केल्यावरही संधी साधू शकतात

अजितदादांसोबत सत्ता स्थापन करणे ही चूक होती असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यावरूनही खडसेंनी त्यांच्यावर टीका केली. फडणवीस अस्वस्थ आहेत. कोणत्याही कारणाने सत्तेत आलं पाहिजे म्हणून त्यांनी अजितदादांसोबत सरकार स्थापन केलं. आता त्यांनी चूक मान्य केली आहे. पण चूक मान्य केल्यानंतरही अजूनही असा प्रसंग आला किंवा एखाद्या पक्षाने त्यांना ऑफर दिली तरी ते सत्ता स्थापन करतील, असा टोला त्यांनी लगावला.

सत्तांतराचे संकेत अन् चर्चांना उधाण

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गेल्या आठवड्यात जळगावच्या दौऱ्यावर होते. यावेळी ते खासदार रक्षा खडसे यांच्या निवासस्थानीही गेले होते. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्यातील सत्तांतराचे संकेत दिले होते. सध्या कोविडचा काळ आहे. आमचं सर्व लक्ष त्याकडे आहे. राजकीय सत्तांतर वगैरेकडे आमचं लक्ष नाही. देणार नाही. एकदा संकट गेलं तर बघू, असं सूचक विधान फडणवीस यांनी केलं होतं. त्यामुळे राज्यात सत्तांतर होण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे. (eknath khadse taunt devendra fadnavis over government forming with ajit pawar)

संबंधित बातम्या:

एक दिवस देवेंद्र फडणवीस मातोश्रीवरही येतील: संजय राऊत

संजय राऊतांची अवस्था ना घरका ना घाटका; देवेंद्र फडणवीसांची टीका

Maharashtra Unlock: राज्यातील लॉकडाऊन आजपासून उठणार, पंचस्तरीय सूत्राची अंमलबजावणी

(eknath khadse taunt devendra fadnavis over government forming with ajit pawar)

75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.