एकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात नव्हे तर उजेडात होईल, राष्ट्रवादीला बळ मिळेल : जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा केली.

एकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात नव्हे तर उजेडात होईल, राष्ट्रवादीला बळ मिळेल : जयंत पाटील
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:00 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा केली. “गेले तीन दशकं भाजपचे नेतृत्व करणारे, उत्तर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंसह काम करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्याचं सांगितलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले. (Eknath Khadse to enter NCP on Friday Jayant Patil announce)

एकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात होणार नाही, उजेडात होईल, खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच फायदा होईल, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

खडसेंनी भाजपचा त्याग केल्याने शुक्रवारी दुपारी २ वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील. त्यामुळे राष्ट्रवादीचं बळ वाढेल. एक अनेक वर्षांचा अनुभवी नेता अनेक प्रश्नांशी मुद्द्यांवर काम करुन, महाराष्ट्राची जाण असणार नेता राष्ट्रवादीत येत आहे. त्यांचं स्वागतं, असं जयंत पाटील यांनी नमूद केलं.

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

गेले तीन दशकं भाजपचे नेतृत्व करणारे, उत्तर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंसह काम करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्याचं सांगितलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांची जाण असलेला नेता राष्ट्रवादीत येत आहे, त्यांचं स्वागत, सध्या प्रवेशाची बातमी, त्यांना कोणतं पद मिळणार हे योग्य वेळी समजेल

भाजपमध्ये एकनाथ खडसेंवर होणारा त्रास सर्वांनी पाहिला आहे, त्यामुळे त्यांनी पक्षाचा त्याग केला, आणखी कोण येणार, याचा उलगडा हळूहळू होईल

एकनाथ खडसेंसोबत येण्याची अनेक जणांची इच्छा, मात्र कोरोना काळात विधानसभा निवडणूक घेणे शक्य नाही, त्यामुळे हळूहळू सर्वांचे प्रवेश होतील, अनेक जण त्यांच्या संपर्कात

एकनाथ खडसेंना आम्ही प्रवेश दिला आहे, भाजपकडून हिरमोड झालेले आणि भाजपकडून विकासाची अपेक्षा न उरलेले एकनाथ खडसेंसोबत येतील

विविध भागातील तीन ते चार भाजप नेत्यांशी चर्चा, त्यांचीही राष्ट्रवादीत येण्याची इच्छा, एकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात होणार नाही, दिवसाढवळ्याच होईल.

टीव्ही 9 च्या बातमीवर शिक्कामोर्तब

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिकृत घोषणा केली. नाथाभाऊ समर्थक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ खडसे यांच्या बंगल्यावर जमा झाले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची उत्सुकता आहे. मुंबईत राष्ट्रवादीकडून खडसेंच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा झाली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी  पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. (Eknath Khadse to enter NCP on Friday announce Jayant Patil)

एकनाथ खडसे यांची राजकीय कारकीर्द

1980 मध्ये खडसे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या रुपात सक्रिय राजकारणात प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रात भाजपचा पाया प्रस्थापित करण्यात एकनाथ खडसेंचा मोठा वाटा मानला जातो. लेवा समाजातील असलेल्या खडसेंकडे ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिले जाते.

एकनाथ खडसे यांनी लढवलेली पहिली निवडणूक कोथडी ग्रामपंचायतीची होती. मात्र पहिल्याच निवडणुकीत खडसेंना पराभवाचा धक्का बसला होता. पुढे, 1987 मध्ये त्याच कोथडी गावाचे ते सरपंच झाले. 1989 मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. सलग सहा टर्म (1989 – 2019) म्हणजे तब्बल तीस वर्ष मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला राहिला.

संबंधित बातम्या 

Eknath Khadse | पहिल्या निवडणुकीत पराभव ते 30 वर्ष मुक्ताईनगरवर अधिराज्य, एकनाथ खडसेंची कारकीर्द

कन्येसह राष्ट्रवादीत जाणार; सून मात्र भाजपमध्येच राहणार; नाथाभाऊंची नवी ‘खेळी’

मोठी बातमी: मोदींकडून भ्रमनिरास झाल्याचे ‘ते’ रिट्विट एकनाथ खडसेंकडून डिलीट   

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचना? 

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.