जळगाव: भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी दिल्याचं वृत्त आहे. परवा शुक्रवारी दुपारी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मात्र खडसे यांच्या स्नुषा आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे या मात्र भाजपमध्येच राहणार असून हा खडसे यांच्या राजकीय खेळीचा भाग असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (eknath khadse will join ncp but raksha khadse will not quite bjp)
भाजपसाठी 40 वर्षे योगदान दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. जळगावमधील खडसे समर्थकांनी जळगाव महापालिका बरखास्त करण्याचं पत्रं महापालिका आयुक्तांना दिल्यानंतर तेव्हाच खडसे भाजपमधून बाहेर पडणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यातच खडसे समर्थकांनी जळगावमधील पोस्टरवरून कमळाचं चिन्हं गायब केल्याने तर त्यावर शिक्कामोर्तब झालं होतं. परवा शुक्रवारी दुपारी 2 वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
आपली खासदारकी कायम ठेवण्यासाठी रक्षा खडसे या भाजपमध्येच राहणार असल्याचं सांगण्यात येत. राष्ट्रवादीतून खासदारकीचा राजीनामा देऊन उदयनराजे भोसले भाजपमध्ये गेले होते. मात्र, साताऱ्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व असल्याने पोटनिवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव झाला होता. सध्या जळगावातही तिच परिस्थिती आहे. जळगावमध्ये गिरीश महाजन आणि पर्यायाने भाजपचं वर्चस्व आहे. त्यामुळे खासदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत गेल्यास पराभवाचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती असल्यानेच रक्षा खडसे यांनी तूर्तास भाजपमध्येच राहण्याची भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपने एकनाथ खडसे यांचं तिकीट कापून रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, निवडणूक प्रचारातून भाजप कार्यकर्त्यांनी अंग काढून घेतल्यानं रोहिणी यांना पराभवाचा फटका बसला होता. पक्षांतर्गत दगाबाजीमुळेच रोहिणी खडसेंचा पराभव झाला असून त्याला पक्षातील बडे नेते जबाबदार असल्याचा आरोप खडसेंनी केला होता. रक्षा खडसे या भाजपमधून बाहेर पडल्यास लोकसभेच्या होणाऱ्या पोटनिवडणुकीत असाच दगाफटका होण्याची शक्यता असल्यानेही रक्षा यांना भाजपमध्येच ठेवण्याची खेळी नाथाभाऊंनी खेळल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. (eknath khadse will join ncp but raksha khadse will not quite bjp)
EXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश! https://t.co/0pHrKN8FPS #EknathKhadse
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2020
संबंधित बातम्या:
EXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश!
अजित पवारांनी दौरे टाळले, कणकण आणि ताप आल्याने घरीच विश्रांती, कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह
अतिवृष्टीग्रस्तांना गुरुवारी आर्थिक मदत जाहीर करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
(eknath khadse will join ncp but raksha khadse will not quite bjp)