बच्चू कडू यांच्या मंत्रीपदाबाबत एकनाथ खडसे यांचा मोठा दावा
रवी राणा आणि बच्चू कडू वादावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी बच्चू कडू यांच्या मंत्रीपदाबाबत मोठा दावा केला आहे.
मुंबई : खोके घेतल्याच्या आरोपांवरुन आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादावर जाहीररीच्या पदडा पडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर आता दोन्ही आमदारांनी वाद मिटवला आहे. रवी राणा यांनी देखील आपले अपशब्द मागे घेत दिलगीरी व्यक्त करतो असे म्हणत माघार घेतली आहे. मात्र, या वादावर स्पष्टपणे न बोलता बच्चू कडू यांनी आपल्या भूमिकेबाबत सप्सेंस ठेवला आहे. कार्यर्त्यांच्या मेळाव्यात आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले. या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी बच्चू कडू यांच्या मंत्रीपदाबाबत मोठा दावा केला आहे.
राणा-कडूंचं भांडण वाढू नये म्हणून फडणवीसांनी मध्यस्थी केली असे एकनाथ खडसे म्हणाले. भांडण मिटवण्याचा प्रयत्न म्हणजे तेरी भी चूप, मेरी भी चूप असा प्रकार असल्याचा टोला देखील एकनाथ खडसे यांनी लगावला.
बच्चू कडू राज्यमंत्र्यांऐवजी आता मंत्री होतील असा दावा देखील एकनाथ खडसे यांनी केला आहे. बच्चू कडू आणि रवी राणा यांचं हे आपसातलं भांडण होतं हे भांडण वाढू नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली
बच्चू कडूंनी सात आठ आमदार घेवून बाहेर जाण्याचं म्हटलं होते. त्यामुळे आता बच्चू कडू हे पुढच्या कालखंडात राज्य मंत्र्यांच्या ऐवजी फक्त मंत्री होतील असेही खडसे म्हणाले.