MIDC जमीन प्रकरणात खडसेंना राजीनामा देण्याची वेळ, फडणवीसांचा पलटवार

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नाव घेऊन आरोप केल्यानंतर, त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. (Devendra Fadnavis on Eknath Khadse)

MIDC जमीन प्रकरणात खडसेंना राजीनामा देण्याची वेळ, फडणवीसांचा पलटवार
Follow us
| Updated on: Sep 11, 2020 | 1:16 PM

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नाव घेऊन आरोप केल्यानंतर, त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ खडसेंना मनीष भंगाळे प्रकरणात नव्हे तर MIDC जमीन खरेदीप्रकरणात राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यावर गुन्हा माझ्यामुळे नाही तर उच्च न्यायालयाच्या आदेशान दाखल झाला, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा खडसेंना बॅकफूटवर ढकललं. (Devendra Fadnavis on Eknath Khadse)

देवेंद्र फडणवीस आज राजधानी दिल्लीत आहेत. त्यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ खडसे, मराठा आरक्षण, कंगना रनौत अशा विविध विषयावर भाष्य केलं.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

एकनाथ  खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर मी काही टीका करणार नाही. मनीष भंगाळेबाबत ते बोलत आहेत, पण त्या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला नाही, त्यांना MIDC प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. मनीष भंगाळे प्रकरणात खडसेंना क्लिन चीट आहे. त्या प्रकरणात त्यांना कुठेही राजीनाम द्यावा लागला नाही. कुटुंबीयांसाठी जमीन घेतल्याचा आरोप झाला, जमीन घेत असताना खडसे पदावर होते, त्यावर आम्ही चौकशी समिती नियुक्त केली. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाला.

उच्च न्यायालायने खडसेंवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, तो गुन्हा मी दाखल केला नाही. विनाकारण लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं कारण नाही, आमच्या ज्येष्ठ नेत्यांच्या तक्रारी घरातल्या घरात मिटवू.

एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांच्या या दाव्यानंतर, एकनाथ खडसे यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली. खडसे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस म्हणतात त्यापेक्षा जास्त मी संयमी आहे. संयम पाळला आहे पाच वर्ष झाली सहन केलं. एमआयडीसी प्रकरणात राजीनामा घेतला, तर कुठल्या कारणासाठी? एमआयडीसीची तथाकथित जी जमीन घेतली, ती एका मुस्लीम व्यक्तीची होती. २०१० पर्यंत त्या व्यक्तीचे नाव सातबाऱ्याच्या उताऱ्यावर होते, तो हे दाखवतो. २०१० नंतर इतर हक्कात एमआयडीसीचे नाव लावण्यात आले. त्यानंतर कागदपत्रे पाहूनच ती जमीन खरेदी केली आहे, माझ्या बायकोने, जावयाने. एकनाथ खडसेने ती जमीन खरेदी केलेली नाही. जर मी ती केली असेन, तर मी त्यात दोषी आहे. बायकोने किंवा जावयाने व्यवहार केले आस्तिक, तर मी कसा दोषी?”

एकनाथ खडसे काय म्हणाले होते?

“माझ्याविरुद्ध जे षडयंत्र रचले, ते देवेंद्र फडणवीस यांनी, मला देवेंद्रजींच्या माध्यमातून त्रास झाला, हे नाव घेऊन सांगतो” असा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. मी पुरावे जमा केले आहेत, मी वरिष्ठांना जाब विचारणार, असेही खडसे यांनी सांगितले. लेखक सुनिल नेवे यांनी लिहिलेल्या ‘जनसेवेचा मानबिंदू’ या एकनाथ खडसे यांच्या चरित्राचे प्रकाशन मुक्ताईनगरमध्ये झाले. त्यावेळी खडसे बोलत होते.

(Devendra Fadnavis on Eknath Khadse)

संबंधित बातम्या 

नाव घेऊन सांगतो, देवेंद्रजींच्या माध्यमातून मला त्रास, पुरावेही जमवले, चरित्राच्या प्रकाशनात खडसेंची खदखद

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.