संदीप राजगोळकर, प्रतिनिधी, नवी दिल्ली : आज शिंदेगटासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण आज शिंदेगटाला (Eknath Shinde) निवडणूक चिन्ह मिळण्याचीआज निश्चित होण्याची शक्यता आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यंत पर्याय सादर करण्याची मुदत होती. त्यामुळे शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर (Election Commission) 3 चिन्हांचा पर्याय सादर करण्यात आला आहे. ई-मेलवरून शिंदे गटाने 3 पर्याय सादर केल्याची माहिती आहे.
शिंदेगटाकडून तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगासमोर मांडण्यात आलाय. शंख, तुतारी आणि रिक्षा ही तीन चिन्हे शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर ठेवली आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मूळचे रिक्षाचालक आहेत. त्यामुळे शिंदेगटाने रिक्षा या चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे करावी, असा लोकांमध्ये सूर होता. तशी सोशल मीडियावरही चर्चा होती. तेच चिन्ह आता शिंदेगटाने सादर केलंय.
निवडणूक चिन्हासाठी शिंदेगटाने निवडणूक आयोगाला दोन मेल पाठवण्यात आल्याची माहिती आहे. पहिल्या मेलमधून शंख, तुतारी आणि रिक्षा ही तीन चिन्हे शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर ठेवली आहेत. तर दुसऱ्या मेलमध्ये ढाल-तलवार, सूर्य, पिंपळाचं झाड हे तीन चिन्ह आयोगासमोर ठेवण्यात आल्याची माहिती आहे.