Eknath Shinde : बंडखोर आमदारांनी महाराष्ट्राची सीमा ओलांडली कशी? पवारांच्या नाराजीनंतर गृहखात्याचा मोठा निर्णय, मंत्री, राज्य मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई होणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यात दोन बैठका पार पडल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना कारवाईचे आदेश दिल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे.

Eknath Shinde : बंडखोर आमदारांनी महाराष्ट्राची सीमा ओलांडली कशी? पवारांच्या नाराजीनंतर गृहखात्याचा मोठा निर्णय, मंत्री, राज्य मंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई होणार
दिलीप वळसे पाटील, गृहमंत्रीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 8:53 PM

मुंबई : महाराष्ट्रातील जवळपास चाळीस आमदार आणि काही मंत्री (Eknath Shinde) ही अर्ध्या रात्री महाराष्ट्राची सीमा ओलांडून गुजरातला गेले. तिथून ते गुजरात पोलिसांच्या बंदोबस्तात (Maharashtra Police) गुवाहाटीपर्यंत पोहोचले. मात्र एवढे सगळे आमदार बाहेर जातात आणि महाराष्ट्र पोलिसांना साधी खबरही लागत नाही? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या गृहखात्यानं आता मोठा निर्णय घेतलाय. गुवाहाटीमध्ये पोहोचलेल्या सर्व आमदार, नेते, खासदार यांच्या पोलीस सुरक्षा रक्षकांनी (Ministers Security) कोणतीही माहिती गृहाखात्याला न दिल्याने या सर्व पोलीस सुरक्षा रक्षकांवर कारवाई होणार असल्याची माहिती ही विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. ही कारवाई लवकच होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यात दोन बैठका पार पडल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांना कारवाईचे आदेश दिल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे. राज्यातील कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री यांचे सुरक्षारक्षक आत्ता अडचणीत येताना दिसत आहे.

पोलीस गुप्तचर विभाग कुठे होता?

सोमवारी विधान परिषदेसाठी मतदान पार पडलं. काही तासात विधान परिषदेच्या सर्व जागांचा निकालही आला. यात महाविकास आघाडीला एका जागेवर दणका बसला. तर भाजपच्या पाच जागा निवडून आल्या. महाविकास या पराभवाची कारणं शोधत असताना आणि इतर नेते यावर प्रतिक्रिया देत असताना. त्याच रात्री एकनाथ शिंदे हे आमदारांचा ताफा घेऊन राज्याच्या बाहेर पडले. यात फक्त आमदारच नाही. तर कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्रीही होते. मग एवढी मोठी घटना घडत असताना सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना कल्पना का दिली नाही आणि गुप्तचर विभागालाही याची खबर कशी लागली नाही? असे म्हणत पवारांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती.

पोलीस आयुक्तांच्या दोन दिवसात दोन बैठका

भल्या सकाळी एवढं मोठं बंड झाल्याची बातमी समोर आल्यानंतर अनेकांना हेच पाहून अजित पवार आणि फडणवीसांचा पाहटेचा शपथविधी आठवला. शिवसेना नेतेही धक्क्यातच होते. मात्र काही वेळातच मुख्यमंत्र्यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांसोबत तातडीची बैठक घेतली. तसेच आजही संजय पांडे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. त्यानंतर आता गृहविभाग हा एक्शन मोडमध्ये आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढच्या काही तासात काही कॅबिनेट मंत्र्यांच्या आणि राज्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.