Cm Eknath Shinde : आजचं मैदान मारलं, उद्याच्या अग्निपरिक्षेची तयारीही सुरू, भाजप आणि शिंदे गटाची आज पुन्हा बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपने नार्वेकरांच्या विजयाची तयारी ही आधीपासूनच सुरू केली होती. गोव्याहून हे आमदार मुंबईत आल्यावर काल रात्रीच शिंदे गटाचे आमदार आणि भाजप आमदार यांच्यात सयुक्त बैठक झाली होती.

Cm Eknath Shinde : आजचं मैदान मारलं, उद्याच्या अग्निपरिक्षेची तयारीही सुरू, भाजप आणि शिंदे गटाची आज पुन्हा बैठक
आजचं मैदान मारलं, उद्याच्या अग्निपरिक्षेची तयारीही सुरू, भाजप आणि शिंदे गटाची आज पुन्हा बैठकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 3:16 PM

मुंबई : आजपासून विधानसभेचं (Assembly Session) विशेष अधिवेशन सुरू झालंय. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि भाजपचं (BJP) पारडं जड ठरलंय. शिवसेनेने शिंदे गटाच्या व्हीपवर आक्षेप घेऊनही भाजपचे राहुल नार्वेकर हे विधानसभेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. मात्र या आक्षेपांची दखल ही दोन्ही बाजुंनी घेण्यात आलीय. शिवसेनेच्या आक्षेपाची दखल ही विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी घेतली आहे. तर शिंदे गटाच्या आक्षेपाची दखल ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे निर्णय काय होणार? याचा अंदाज आत्ता तरी बांधणं कठीण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपने नार्वेकरांच्या विजयाची तयारी ही आधीपासूनच सुरू केली होती. गोव्याहून हे आमदार मुंबईत आल्यावर काल रात्रीच शिंदे गटाचे आमदार आणि भाजप आमदार यांच्यात सयुक्त बैठक झाली होती.

शिंदे आणि फडणवीसांचं करेक्ट प्लॅनिंग

या बैठकीत एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचं प्लॅनिंग आज करेक्ट ठरल्याचे दिसून आले. मात्र आजच्या विजयाने हुरळून न जाता शिंदे आणि भाजपने उद्याच्या अग्निपरीक्षेची तयारीही सुरू केली आहे. कारण उद्या या सरकारची अग्निपरिक्षा होणार आहे, अर्थात बहुमत चाचणी…

शिंदे गट आणि भाजप आमदारांची आज पुन्हा बैठक

शिंदे गट आणि भाजप आमदारांची शनिवारी जी बैठक पार पडली होती. त्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं होतं. आता उद्या सरकारसाठी आणखी महत्वाचा दिवस आहे. त्यामुळे बहुमत चाचणीत कोणतीही चूक होऊ नसे यासाठी आज पुन्हा दोन्ही गटांच्या आमदारांची पुन्हा बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीचा पॅटर्नही शनिवारच्या बैठकीसारखाच असणार आहे. या बैठकीलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मार्गदर्शन करणार आहेत.

आजचं मैदान मारलं, उद्याची अग्निपरीक्षा पार करणार?

एकनाथ शिंदे आणि भाजपने आपल्या बहुमताच्या आणि परफेक्ट प्लॅनिंगच्या जोरावार आजचं मैदान तर सहज मारलं आहे. मात्र उद्याचा पेपरही अवघड असणार आहे. उद्याची बहुमत चाचणी पार करण्यासाठी आता सरकारच्या गोटात प्लॅनिंग सुरू आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी आज राहुल नार्वेकर यांना 164 मतं पडली आहे. त्यामुळे उद्याच्या बहुमत चाचणीसाठी एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्याकडे असल्याचे सध्या तरी दिसत आहे. तर महाविकास आघाडीची गाडी ही आज केवळ 106 मतांवर अडल्याचे दिसून आले. यात काही सदस्य गैरहजरही होते तर काहींनी मतदान केलं नाही. मात्र तरीही एकनाथ शिंदे आणि भाजपला रोखण्यात महाविकास आघाडीची ताकद सध्या कमी पडतेय हे सहज दिसतंय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.