Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : सूरत, अहमदाबाद ते आता गांधीनगर, बंडाचं केंद्र बदलतंय; तीन विमानं, 14 फॉर्च्यूनर गाड्या तयार, शिंदे गट रात्री शहा नड्डांना भेटणार- सूत्र

भाजपच्या गोटातून अजून एक मोठी बातमी समोर येतेय. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार संध्याकाळी सूरतवरुन गांधीनगरला रवाना होणार आहेत. त्यासाठीची व्यवस्थाही तैनात ठेवण्यात आली आहे.

Eknath Shinde : सूरत, अहमदाबाद ते आता गांधीनगर, बंडाचं केंद्र बदलतंय; तीन विमानं, 14 फॉर्च्यूनर गाड्या तयार, शिंदे गट रात्री शहा नड्डांना भेटणार- सूत्र
एकनाथ शिंदे Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 4:36 PM

मुंबई : शिवसेनेचे मातब्बर आणि दुसरे मोठे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचं निशाण फडकावलं. विधान परिषद निवडणूक निकालानंतर शिंदे सोमवारी रात्रीच सूरतला पोहोचले. त्यांच्यासोबत शिवसेनेचे (Shivsena) 20 पेक्षा अधिक आमदार असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून शिंदे यांची गटनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आलीय. तर शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आणि रविंद्र फाटक एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी सूरतमध्ये दाखल झाले आहेत. अशावेळी भाजपच्या गोटातून अजून एक मोठी बातमी समोर येतेय. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार संध्याकाळी सूरतवरुन गांधीनगरला रवाना होणार आहेत. त्यासाठीची व्यवस्थाही तैनात ठेवण्यात आली आहे.

3 चार्टर विमान, 14 फॉर्च्युनर गाड्या तैनात

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या शिवसेना आमदारांना सूतरवरुन अहमदाबादला नेण्यात येणार असल्याची माहिती मिळत होती. मात्र, आता हाती आलेल्या माहितीनुसार शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना संध्याकाळी 7 वाजता सूतरवरुन गांधीनगरला नेण्यात येणार आहे. त्यासाठी सूरतमध्ये 3 चार्टर विमान आणि 14 फॉर्च्युनर गाड्या तैनात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांच्यासोबत शिंदेंची बैठक होणार

संध्याकाळी गांधीनगरला एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसंच भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत बैठक होणार असून त्यानंतर भाजपची पुढची रणनिती आखली जाईल. महत्वाची बाब म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले आहेत. फडणवीस देखील संध्याकाळी शाह आणि नड्डा यांच्यासोबत गांधीनगरला पोहोचतील आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीत फडणवीसही सहभागी होण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदेंचं सूचक ट्विट

बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या मनातील खदखद आता बाहेर येताना दिसत आहे. त्यांनी एकाच ट्विट मधून तीन वेगवेगळ्या पध्दतीने पक्षाला इशाराच दिला आहे. आपण शिवसैनिक आहोत पण ते बाळासाहेबांचे असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री यांना अलगद बाजूला सारले आहे. बाळासाहेबांनी आपल्याला हिंदुत्वाची शिकवण दिल्याचे सांगत आता त्या शिवकणीचा विसर पक्षाला पडत आहे. म्हणूनच हा निर्णय घेतल्याचेही सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. शिवाय आपल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव असल्याचे सांगत आतान निर्णयापासून माघार नाहीच असा इशाराच त्यांनी पक्षाला दिला आहे की काय असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, एका ट्विटने नाराज एकनाथ शिंदे यांनी आपली सर्व भूमिकाच मांडली असून हे पक्षाला विचार करायला लावणारी आहे.

धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं
धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं.
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला.
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?.
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग.
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले.
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला.
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.