Eknath Shinde : शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; मीरा भाईंदरमधील शिवसेनेची कार्यकारिणी रद्द

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर अनेकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे हे आमने -सामने आल्याचे पहायला मिळाले. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

Eknath Shinde : शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का; मीरा भाईंदरमधील शिवसेनेची कार्यकारिणी रद्द
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 2:43 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर अनेकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे हे आमने -सामने आल्याचे पहायला मिळाले. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना(Sivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मीरा-भाईंदर शहरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची नवी कार्यकारिणी जाहीर केली होती. कार्यकारिणीवर नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या होता. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयालाच आव्हान दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आलेली कार्यकारिणी रद्द केली आहे. त्या जागी आता नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, या कार्यकारिणीवर शिंदे गटातील 9 पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे.

नवीन कार्यकारिणी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली कार्यकारिणी रद्द करत एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाप्रमुखपदी राजू भोईर , महिला संघटकपदी निशा नार्वेकर , युवासेना अधिकारी स्वराज पाटील, विधानसभा संघटकपदी विक्रम प्रताप सिंह, महिला संघटक गिरा व्यास, युवा अधिकारी उदय पार्सेकर,  विधानसभा संघटकपदी  सचिन मांजरेकर, महिला संघटक पूजा आमगावकर, युवा अधिकारी रवी तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेची कार्यकारिणी

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेकडून सावध पाऊले उचलण्यात येत असून, पक्षविरोधी कारवायाचा ठपका ठेवत अनेकांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनी मीरा-भाईंदरमधील पूर्वीची कार्यकारिणी बरखास्त करत नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या दिल्या होत्या. मात्र आता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची पूर्वीची कार्यकारिणी रद्द करत नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. उद्धव ठाकरे यांच्या जुन्या कार्यकारिणीमध्ये  जिल्हाप्रमुखपदी प्रभाकर म्हात्रे , महिला संघटक स्नेहल सावंत , युवा अधिकारीपदी पवन घरत यांच्यासह नीलम ढवण, शंकर वीरकर , लक्ष्मण जंगम , बर्नड डिमेलो, शैलेश पांडे, संदीप पाटील, धनेश पाटील , जयराम मेसे , सुप्रिया घोसाळकर , शुभांगी कोटियन , प्रशांत पालांडे , जयलक्ष्मी सावंत यांना संधी देण्यात आली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.