Eknath Shinde Cabinet : आषाढीनंतर कोण मंत्री? कोण वेटिंगवर? संभाव्य मंत्र्यांची पहिली यादी, एका क्लिकवर

पहिल्या रांगेत कुणाची वर्णी लागणार आणि कुणाला वेटिंगवर राहवं लागणार? याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आम्ही तुम्हा तो सस्पेन्सही थोडा सोपा करून सांगतोय.

Eknath Shinde Cabinet : आषाढीनंतर कोण मंत्री? कोण वेटिंगवर? संभाव्य मंत्र्यांची पहिली यादी, एका क्लिकवर
आषाढीनंतर कोण मंत्री? कोण वेटिंगवर?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 10:51 PM

मुंबई : आषाढी एकादशीनंतरच, मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet) होणार हे मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी (Devendra Fadnavis) स्पष्ट केलं. 10 जुलैला आषाढी एकादशी आहे आणि 11 जुलैला सुप्रीम कोर्टात 16 आमदारांची अपात्रता आणि सुनिल प्रभूंच्या व्हिपवरुन सुनावणी आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे शिंदे-फडणवीसांचं लक्ष आहे. त्यामुळं 12 किंवा 13 जुलैला शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. त्यातही पहिल्या टप्प्यात 13 कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो. ज्यात भाजपचे 8 आणि शिंदे गटाकडून 5 जण कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. यात पहिल्या रांगेत कुणाची वर्णी लागणार आणि कुणाला वेटिंगवर राहवं लागणार? याकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. आम्ही तुम्हा तो सस्पेन्सही थोडा सोपा करून सांगतोय.

भाजपकडून कोण कोण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात?

  1. चंद्रकांत पाटील कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील सध्या प्रदेशाध्यक्ष आहेत. पण ही जबाबदारी इतर नेत्यांकडे दिली जाईल. चंद्रकांत पाटील फडणवीस सरकारमध्ये महसूलमध्ये होते.
  2. भाजपकडून दुसरं नाव सुधीर मुनगंटीवारांचं अधिक चर्चेत आहेत. 2014 ते 2019 मध्ये मुनगंटीवार अर्थमंत्री होते.
  3. गिरीश महाजनही कॅबिनेट मंत्री होऊ शकतात. फडणवीस सरकारमध्ये महाजनांनी जलसंपदा मंत्रिपदाची धुरा सांभाळली.
  4. आशिष शेलारांचाही मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्याच टप्प्यात नंबर लागू शकतो. शेलारांना कॅबिनेटमध्ये संधी मिळेल असं बोललं जातंय. फडणवीस सरकारमध्ये शेवटच्या काही महिन्यांमध्ये शेलारांना संधी मिळाली होती. त्यावेळी ते शालेय शिक्षण मंत्री होते.
  5. चंद्रकांत पाटलांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी दिली तर भाजपला नव्या प्रदेशाध्यक्षपदाची निवड करावी लागेल. आणि त्यासाठी भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं नाव चर्चेत आहे. भाजपनं मुख्यमंत्रीपदासाठी मराठा कार्ड खेळलं. आणि थेट एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्रिपद दिलं. आता प्रदेशाध्यक्षपदी ओबीसी चेहरा भाजप देऊ शकते. त्यासाठी चंद्रशेखर बावनकुळेंचं नाव आघाडीवर आहे. फडणवीस सरकारमध्ये बावनकुळे ऊर्जा मंत्री होते. 2019च्या विधानसभा निवडणुकीत, चंद्रशेखर बावनकुळेंना तिकीटच दिलं नव्हतं. त्याचा फटका विदर्भात भाजपला बसला. त्यानंतर विधान परिषदेवर घेऊन बावनकुळेंना आमदार केलं. आता महाराष्ट्र भाजपची कमानंच त्यांच्यावर दिली तर फायदा होईल, असं भाजप वाटतंय.

शिंदे गटाकडून कोण शपथ घेण्याची शक्यता?

  1. शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील शपथ घेऊ शकतात. महाविकास आघाडी सरकारमध्ये गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री होते.
  2. दादा भूसेही कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये भूसे कृषी मंत्री होते.
  3. शंभूराज देसाईंचाही कॅबिनेट मंत्री म्हणून नंबर लागू शकतो. महाविकास आघाडी सरकारमध्ये शंभूराज देसाई गृहराज्यमंत्री होते
  4. उदय सामंतही पहिल्याच टप्प्यात कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतील अशी शक्यता आहे. याआधी सामंत मविआ सरकारमध्ये उच्च तंत्रशिक्षण मंत्री होते.
  5. प्रहार संघटनेचे बच्चू कडूही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली अशी चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये बच्चू कडून शिक्षण राज्यमंत्री होते.

कुणाला कोणतं खाती मिळू शकतात?

4 आमदारांच्या मागे 1 मंत्रिपद या सूत्रानुसार मंत्रिपदाचं वाटप होणार असल्याचं कळतंय. भाजपकडे 25 ते 27 मंत्रिपदं जाण्याची शक्यता आहे तर शिंदे गटाला 13 ते 14 मंत्रिपदं मिळू शकतात. दिल्लीत शिंदे आणि फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. या भेटीत महत्वाच्या खात्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. गृह, अर्थ, महसूल खातं, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा, पाणीपुरवठा ही खाती भाजपकडे जाऊ शकतात. तर शिंदे गटाला नगरविकास खातं, उद्योग खातं, ग्रामविकास, कृषी, परिवहन खातं, पर्यावरण खातं मिळू शकते. मुख्यमंत्रिपद भाजपनं शिंदेंना दिलं. त्यामुळं इतर खाते वाटपात भाजपचा दबदबा अधिक असेल अशी शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.