उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी शिंदे गटाचं पुढचं पाऊल…
उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी शिंदेगट प्रयत्न करतोय. आता एक पुढचं पाऊल त्यांनी उचललं आहे.
मुंबई : शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क यांचं एक वेगळं नातं आहे. यंदा शिवतिर्थवर दसरा मेळावा होणार आहे. पण उद्धव ठाकरेंचा की एकनाथ शिंदेंचा? यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे. कारण शिंदेगटाला (Eknath Shinde) बीकेसीमधील मैदानावर मेळाव्याची परवानगी मिळालेली आहे. अश्यातही शिंदेगट शिवतिर्थवरच दसरा मेळावा घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) अडचणीत आणण्यासाठी शिंदेगट प्रयत्न करतोय. आता या सगळ्यात मुंबई महापालिका कुणाला परवानगी देते हे पाहणं महत्वाचं असेल.