Eknath Shinde : एकनाथ शिदेंशी संपर्क झाला, संजय राऊत म्हणतात, ‘आईचं दूध विकणारे शिवसेनेत कधी निर्माण होणार नाहीत…’

25 पेक्षा अधिक आमदारांसोबत बंड पुकारल्यानं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

Eknath Shinde : एकनाथ शिदेंशी संपर्क झाला, संजय राऊत म्हणतात, 'आईचं दूध विकणारे शिवसेनेत कधी निर्माण होणार नाहीत...'
एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांवर नाराज?Image Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 11:19 AM

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडण्याची शक्यताय. शिवसेनेचे (shiv sena) एक-दोन नव्हे तर तब्बल पंचवीस पेक्षा अधिक आमदार नॉटरिचेबल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी 25 पेक्षा अधिक आमदारांसोबत बंड पुकारल्यानं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. यात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. तर आईचं दूध विकणारे शिवसेनेत कधी निर्माण होणार नाहीत, असंही राऊत म्हणाले आहेत. यामुळे देखील अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नॅटरिचेबल एकनाथ शिंदेंसोबत संजय राऊतांचा संपर्क झाला कसा? की सगळं काही ठिकठाक असल्याचं शिवसेनेकडून दाखवलं जातंय? वारंवार संजय राऊत एकीकडे भाजपवर आरोप करता थांबत नाहीयत. तर दुसरीकडे नॅटरिचेबल आमदारांशी संपर्क सुरू असल्याची माहिती संजय राऊत देतायेत.

संजय राऊत नेमकं काय म्हणालेत?

शिवसेने नेते संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘आज सकाळपासून अनेकांशी संपर्क झाला आहे. एकनाथ शिंदे हे मुंबईच्या बाहेर आहेत. त्यांच्याशीही संपर्क झाला आहे. जसे चित्र निर्माण केलं आहे. तसं काही भूकंप वगैरे आहे. नक्कीच काही गोष्टी संशयास्पद आहेत. त्याबाबत वर्षावर सर्वांची बैठक आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून सर्व आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. राजस्थान आणि मध्यप्रदेश पॅटर्न प्रमाणे ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहे. पण हा पॅटर्न चालणार नाही. या पद्धतीने तुम्हाला किंगमेकर होता येणार नाही. महाराष्ट्राच्या छातीवर घाव घालता येणार नाही. शिवसेनेवर घाव घालणं म्हणजे महाराष्ट्रावर घाव घालणं. मुंबईवर ताबा मिळवण्याची लोढा यांची भाषा , मुंबईवर ताबा म्हणजे नेमकं यांना काय हवंय. असे प्रयत्न त्यांनी आधीही केले आहे. शिवसेनेत आहेचं दूध ओकणारी औलाद होणार नाही. शिवसेना ही निष्ठावंतांची सेना आहे. सत्तेसाठी आणि पदासाठी स्वता:ला विकरणाही औलाद महाराष्ट्रात निर्माण होणार नाही. जे बाहेर पडले त्यांची अवस्था आपण पाहतोय. अनेक आमदार आत्ता वर्षावर येत आहेत. अनेक नावं आम्ही पाहतोय. जे आमदार इथे नाहीत ते सांगतात की आम्हाला काय झालंय कळत नाही. हे आमदार गुजरातमध्ये सुरतमध्ये आहेत. आमदारांची व्यवस्था भाजप नेते आरसी पाटील करत आहे. सुरतलाच का नेलं.’ असा सवालही राऊत यांनी केलाय.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेचे संपर्कात नसलेले आमदार

1. एकनाथ शिंदे 2. शंभूराज देसाई 3. अब्दुल सत्तार 4. संदीपान भुमरे 5. भरत गोगावले 6. महेंद्र दळवी 7. संजय शिरसाठ 8. विश्वनाथ भोईर 9. बालाजी केणीकर 10. किमा दाबा पाटील 11. तानाजी सावंत 12. महेश शिंदे 13. थोरवे 14. शहाजी पाटील 15. प्रकाश आबिटकर 16. अनिल बाबर 17. किशोर अप्पा पाटील 18. संजय रायमुलकर 19. संजय गायकवाड 20. शांताराम मोरे 21. लता सोनवणे 22. श्रीनिवास वणगा 23. प्रकाश सुर्वे 24. ज्ञानेश्वर चौगुले 25. प्रताप सरनाईक 26. यामिनी जाधव

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.