मुंबई : एकनाथ शिंदे सध्या नॉट रिचेबल आहेत. त्यानंतर त्यांनी पहिली फेसबुक पोस्ट लिहिली आहे. “योग म्हणजेच संतुलित मन, सुखी, निरोगी आणि समृध्द जीवनाचा राजमार्ग…”, अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
एकनाथ शिंदे सध्या नॉट रिचेबल आहेत. त्यानंतर त्यांनी पहिली फेसबुक पोस्ट लिहिली आहे. “योग म्हणजेच संतुलित मन, सुखी, निरोगी आणि समृध्द जीवनाचा राजमार्ग…”, अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
काल रात्रीपासून एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये आहे. सूरतच्या ली मेरिडिअन हॉटेलात ते थांबले आहेत. काल रात्री उशीरा ते हॉटेलमध्ये गेले असण्याची शक्यता आहे. सकाळपासून ते नॉट रिचेबल असल्याचं म्हटलं जातं आहे. सगळीकडे राजकीय चर्चांना उधान आलेलं असतानाही ते रिचेबल झालेले नाहीत.
शिवसेनेचे काही आमदार त्यांच्यासोबत असल्याची माहिती मिळाली आहे. कालच्या शिवसेनेच्या बैठकीला अनेक आमदार गैरहजर असल्याची माहिती समजली होती. तेचं आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहाजी बापू पाटील, महेश शिंदे सातारा, भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेश थोरवे, विश्वनाथ भोईर, संजय राठोड, संदीपान भुमरे, उदयसिंह राजपूत, संजय शिरसाठ, रमेश बोरणारे, प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार इत्यादी आमदार सोबत असल्याची माहिती मिळाली आहे.
काल संध्याकाळपासून एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होते. काही आमदारही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची शक्यता वर्तवली जातेय. विधान परिषद निकालानंतर शिवसेनेमध्ये खदखद आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे मोठा राजकीय निर्णय घेणार का, यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलंय. ज्या ग्रॅन्ड भगवती हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आहेत, तिथल्या हॉटेल व्यवस्थापनाशीही टीव्ही 9 मराठीनं संपर्क साधला. त्यावेळी नुकतेच ते हॉटेलच्या बाहेर गेल्याची माहिती हॉटेलकडून देण्यात आली.
नाराज एकनाथ शिंदेंच्या यांच्याशी निगडीत ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
Eknath Shinde Live Update : एकनाथ शिंदे बारा वाजता पत्रकार परिषद घेण्याची शक्यता