Eknath Shinde : आधी शिवसेनेवर कब्जा आणि मग सत्ता स्थापनेचा मनसुबा? एकनाथ शिंदेंचा प्लान काय?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आहे. मात्र सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे ही बंडखोरी केवळ मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी किंवा सत्तेसाठी नाही. तर मुळ शिवसेना पक्षच कसा आपल्याकडे येईल यासाठी आता शिंदेंकडून प्रयत्न केले जात आहेत.

Eknath Shinde : आधी शिवसेनेवर कब्जा आणि मग सत्ता स्थापनेचा मनसुबा? एकनाथ शिंदेंचा प्लान काय?
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 7:58 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आहे. मात्र सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे ही बंडखोरी केवळ सत्तेसाठी किंवा मुख्यमंत्रीपदासाठी नाहीये. तर शिवसेना (Shivsena) हा मूळ पक्ष आणि पक्षाचे चिन्ह असलेले धनुष्यबाण हे आपल्याच गटाकडे कसे येईल यासाठी हे बंड करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी कायदेशीर लढाई देखील उभारली असून, या कामात त्यांना भाजपाचे (BJP) कायदे पंडित मदत करत असल्याचे वृत्त समोर येत आहे. ही लढाई जिंकणे वाटते तितके सोपे नाही. मात्र एकनाथ शिंदे यांंनी त्या दिशेने प्रयत्न सुरू केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्याचे समोर येताच त्यांना गटनेते पदावरून हटवण्यात आले. त्यांच्या जागी गटनेता म्हणून अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र एकनाथ शिंदे यांनी आता या निवडीलाच आव्हान दिले आहे.

शिंदेंचे उपाध्यक्षांना पत्र

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना गटनेते पदावरून हटवले आहे. त्यांच्या जागी गटनेता म्हणून आता आजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या निवडीवर एकनाथ शिंदे यांनी अक्षेप घेतला आहे.  शिंदे यांनी याबाबत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र पाठवले आहे. अशा प्रकारची कारवाई बेकायदेशीर असल्याचे या पत्रात त्यांनी म्हटले आहे. एवढेच नव्हे तर शिंदे यांनी 34 आमदारांच्या सह्या घेत मुख्य पक्ष प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती केली आहे. या लढाईत एकनाथ शिंदे हे यशस्वी झाल्यास बंडखोर आमदार हे बंडखोर नसून, तेच मुळ शिवसैनिक असल्याचे एकनाथ शिंदे यांना दाखवता येणार आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्र्यांचे बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन

दरम्यान दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी बुधवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केले आहे. तुम्ही समोर या, मला सांगा तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नको आहेत तर मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. सोबतच शिवसेना पक्षप्रमुख पद देखील सोडण्याची आपली तयारी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांना मिळणाऱ्या आमदारांचा पाठिंबा वाढत असून, त्यामुळे शिवसेनेच्या आडचणीत आणखी वाढ झाली आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.