एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात जागतिक विक्रम
वांद्रे येथील BKC मैदानावर होत आहे. BKC मैदानावर तुफान गर्दी झाली आहे. एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मोठा विश्वविक्रम झाला आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) गटाचा दसरा मेळावा(Dasara Melava ) वांद्रे येथील BKC मैदानावर होत आहे. BKC मैदानावर तुफान गर्दी झाली आहे. एकनाथ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मोठा विश्वविक्रम झाला आहे.
12 फुटी चांदीची तलावार देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांना दसरा मेळाव्या निमित्ताने 12 फुटांची चांदीची तलवार भेट म्हणून दिली आहे.
या तलावारीने विश्वविक्रम केला आहे. याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. आजपर्यंतची ही सर्वात मोठी तलावार आहे. चांदीचा धनुष्यबाण, चांदीची गदा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट म्हणून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 51 फुटी भव्य अशा तलवारीचे पूजन करण्यात आले. रामदास कदम, शंभुराज देसाई व इतर नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. मंत्रोच्चारात शस्त्रपूजा झाली. यानंतर तुळजापूरहून आलेल्या ज्योतीचे त्यांनी दर्शन घेतले.