Ekanath Shinde: आसाममध्ये पूर पण शिवसेनेच्या बंडखोरांचा!, गुलाबराव पाटलासह चार आमदार गुवाहाटीत दाखल

शिवसेनेचे अजून चार आमदार एकनाथ शिंदे यांच्याकड थेट गुवाहाटीला पोहोचले आहेत. शिवसेनेच्या ढाण्या वाघ अशी ओळख असलेले पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह योगेश कदम, अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि मंजुळा गावित गुवाहाटीत दाखल झाले आहेत.

Ekanath Shinde: आसाममध्ये पूर पण शिवसेनेच्या बंडखोरांचा!, गुलाबराव पाटलासह चार आमदार गुवाहाटीत दाखल
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 9:36 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली आहे. मात्र, त्याचवेळी शिवसेनेचे अजून चार आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकड थेट गुवाहाटीला पोहोचले आहेत. शिवसेनेच्या ढाण्या वाघ अशी ओळख असलेले पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यासह योगेश कदम, अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि मंजुळा गावित गुवाहाटीत दाखल झाले आहेत. तिथे या चारही आमदारांचं एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलं.

एकनाथ शिंदेंकडून आमदारांचं स्वागत

गुलाबराव पाटील यांच्यासह गुवाहाटीत दाखल झालेल्या आमदारांचं एकनाथ शिंदे आणि तिथे उपस्थित आमदारांनी स्वागत केलं. गुवाहाटीतील हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर पाटील यांच्यासह योगेश कदम, चंद्रकांत पाटील, मंजुळा गावित यांच्या चेहऱ्यावर एक हास्य पाहायला मिळालं. एकनाथ शिंदे हे आमदारांच्या स्वागतासाठी उभे होते. त्यावेळी गुलाबराव पाटील आणि अन्य आमदारांनी एकनाथ शिंदे यांना नमस्कार करत त्यांचे आशीर्वादही घेतले. त्यावेळी तिथे उपस्थित सर्वच आमदारांच्या चेहऱ्यावर एकप्रकारचं समाधान आणि आनंद पाहायला मिळत होता.

मुख्यमंत्र्यांना भाजपसोबत जाण्याचा सल्ला दिला होता – पाटील

तत्पूर्वी गुलाबराव पाटील यांनी आपण उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत जाण्याचा सल्ला दिला होता असं सांगितलं होतं. पक्षातील फूट टाळण्यासाठई भाजपसोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत माझ्यासह काही आमदारांनी विनंती केली होती. मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. सर्व आमदारही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याने सेनेचे हित लक्षात घेवून, शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली होती.

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्र्यांकडे चार मागण्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत एकनाथ शिंदे आणि बंडखोर शिवसेना आमदारांना भावनिक साद घातली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. शिंदे यांनी ट्विटरच्या  माध्यमातून चार मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यात पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडा असं आवाहन त्यांनी केलंय.

  1. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.
  2. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.
  3. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
  4. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.