Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपद घ्यावं, उद्धव ठाकरेंचा संदेश घेऊन गुलाबराव शिंदेंच्या भेटीला, उद्या दादा भुसेही जाणार – सूत्र

गुलाबराव पाटील अन्य तीन आमदारांसह गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. गुलाबराव पाटील हे उद्धव ठाकरे यांचा संदेश घेऊन गुवाहाटीला पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद घ्यावं अशी थेट ऑफरच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपद घ्यावं, उद्धव ठाकरेंचा संदेश घेऊन गुलाबराव शिंदेंच्या भेटीला, उद्या दादा भुसेही जाणार - सूत्र
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 10:15 PM

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकावल्यामुळे शिवसेनेत मोठा भूकंप पाहायला मिळाला. शिवसनेचे 35 पेक्षा अधिक आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारसमोर मोठं संकट उभं ठाकलंय. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) अन्य तीन आमदारांसह गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. गुलाबराव पाटील हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा संदेश घेऊन गुवाहाटीला पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद घ्यावं अशी थेट ऑफरच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचा निरोप एकनाथ शिंदे यांच्याकडे पोहोचवला आहे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना थेट मुख्यमंत्रीपदाचीच ऑफर दिल्याची माहिती मिळतेय. शिवेसना फुटली तर शिवसैनिक आमदारांना माफ करणार नाहीत, असाही संदेश यावेळी पाटील यांनी शिंदेंना दिल्याचं कळतंय. त्याचबरोबर उद्या कृषीमंत्री दादा भुसेही गुवाहाटीला पोहचतील अशी माहिती मिळत आहे.

एकनाथ शिंदेंकडून आमदारांचं स्वागत

गुलाबराव पाटील यांच्यासह गुवाहाटीत दाखल झालेल्या आमदारांचं एकनाथ शिंदे आणि तिथे उपस्थित आमदारांनी स्वागत केलं. गुवाहाटीतील हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर पाटील यांच्यासह योगेश कदम, चंद्रकांत पाटील, मंजुळा गावित यांच्या चेहऱ्यावर एक हास्य पाहायला मिळालं. एकनाथ शिंदे हे आमदारांच्या स्वागतासाठी उभे होते. त्यावेळी गुलाबराव पाटील आणि अन्य आमदारांनी एकनाथ शिंदे यांना नमस्कार करत त्यांचे आशीर्वादही घेतले. त्यावेळी तिथे उपस्थित सर्वच आमदारांच्या चेहऱ्यावर एकप्रकारचं समाधान आणि आनंद पाहायला मिळत होता.

गुलाबराव पाटील सकाळी काय म्हणाले?

तत्पूर्वी गुलाबराव पाटील यांनी आपण उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत जाण्याचा सल्ला दिला होता असं सांगितलं होतं. पक्षातील फूट टाळण्यासाठई भाजपसोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत माझ्यासह काही आमदारांनी विनंती केली होती. मात्र, त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. सर्व आमदारही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याने सेनेचे हित लक्षात घेवून, शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली होती.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.