Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : गुजरातमध्ये जरूर दांडिया खेळा, महाराष्ट्रात तलवारीला तलवार भिडेल, सामना अग्रलेखातून एकनाथ शिंदे गटाला इशारा

एकनाथ शिंदे  विशेष विमानानं मुंबईत येणार असल्याची माहिती आहे.

Eknath Shinde : गुजरातमध्ये जरूर दांडिया खेळा, महाराष्ट्रात तलवारीला तलवार भिडेल, सामना अग्रलेखातून एकनाथ शिंदे गटाला इशारा
एकनाथ शिंदे विरुद्ध संजय राऊतImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 7:45 AM

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केलं असून महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेना (Shivsena)यांच्यातील वाद आता टोकाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता या सगळ्या प्रकरणावर दैनिक सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आलंय. तर यावेळी एकनाथ शिंदे गटाला इशाराही दिला आहे. यामुळे एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना, हा वाद आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुजरातच्या भूमीवरुन फडफड करणाऱ्यांनी हा इतिहास पुन्हा एकदा समजून घ्यावा. गुजरातमध्ये या मंडळींनी जरूर दांडिया खेळाव्या, पण महाराष्ट्रात तलवारीस तलवार भिडेल हे नक्कीच, असं दैनिक सामनाच्या अग्रलेखात म्हणत एकनाथ शिंदे गटाला इशारा देण्यात आलाय.

दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून टीका

दैनिक सामनाच्या अग्रलेखातून एकनाथ शिंदे गटावर टीका करण्यात आली आहे. यात म्हटलंय की, ‘महाराष्ट्रातल्या सरकारचे काय व कसे होणार, हा प्रश्न नसून महाराष्ट्र वार करणाऱ्यांचे, महाराष्ट्राशी बेइमानी करणाऱ्यांचे काय होणार? फितुरीचे बीज रोवणाऱ्यांचे काय होणार? धर्माच्या मुखवट्याखाली अधर्माशी संग करणाऱ्यांना जनता माफ करेल काय? हे खरे प्रश्न आहेत. संकटांशी व वादळांशी सामना करण्याची शिवसेनेला सवय आहे. गुजरातच्या भूमीवरुन फडफड करणाऱ्यांनी हा इतिहास पुन्हा एकदा समजून घ्यावा. गुजरातमध्ये या मंडळींनी जरूर दांडिया खेळाव्या, पण महाराष्ट्रात तलवारीस तलवार भिडेल हे नक्कीच.’

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे राज्यपालांना भेटणार

एकनाथ शिंदे  विशेष विमानानं मुंबईत येणार असल्याची माहिती आहे. राज्यपालांची  शिंदे भेट घेणार आहेत. यामुळे शिंदे गटाचे ठाकरे सरकारला धक्क्यांवर धक्के बसत असल्याचं दिसतंय. यातच आता मोठी माहिती समोर आली असून एकनाथ शिंदे दुपारनंतर मुंबईत येणार असल्याची माहिती आहे. आतापर्यंत संख्याबळाचं समीकरण जुळतं का, याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलेलं होतं. दोन तृतीआंश आमदारांपेक्षा जास्त संख्याबळ हे एकनाथ शिंदेसोबत असणं गरजेचं होतं. 37 हा आकडा एकनाथ शिंदे यांना गाठायचा होता. आता त्यांनी स्वतःच आपल्याकडे 40 आमदार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा हादरा बसलाय. सत्तास्थापनेचा भाजपसोबत दावा एकनाथ शिंदे करतील, अशी शक्यता आहे. त्यासाठी ते मुंबईमध्ये दुपारी येतील. राज्यपालांची भेट घेतली, असंही सांगितलं जातं आहे. एका विशेष विमानाने एकनाथ शिंदे हे मुंबईला येणार असल्याचं कळतंय.

ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.