Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे कट्टर शिवसैनिक, पण त्यांचा अनेकवेळा पंख छाटण्याचा प्रयत्न; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला
प्रत्येक शिवसैनिकावर बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार राहिलेले आहेत. त्यामुळेच तळागळातील जनतेचे प्रश्न त्यांनी जवळून अनुभवले आहेत. जनतेच्या हाकेला त्यांनी कधीच अंतर दिले नाही. शिवसैनिकांची हीच खासियत असली तरी त्या पध्दतीने त्यांचा राजकीय प्रवास झाला नाही. वेळोवळी होत असलेले खच्चीकरण यामुळे हे नेतृ्त्व समोर येण्यास उशिर झाल्याचे म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे.
मुंबई : (Assembly) विधानसभेत बहुमत सिध्द केल्यानंतर भाजप-सेनेचे सरकार हे आता स्थिर झाले आहे. बहुमत सिध्द होताच (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन ठराव घेण्यात आला. यावेळी (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक तर केलेच पण हे करीत असताना त्यांनी शिवसेनेवर टिकेचे बाणही सोडले. 1980 पासून शाखा प्रमुख ते गटनेता असा त्यांचा प्रवास राहिला आहे. यामध्ये ते खऱ्या अर्थाने जनेतेचे सेवेकरी राहिले आहेत. एक सच्चा शिवसैनिक असतानाही त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न वेळोवेळी झाल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री यांनी शिवसेना नेतृत्वाला टार्गेट केले. आतापर्यंत शिवसेनेत राहूनच एकनाथ शिंदे यांची जडणघडण झाली असताना आता त्यांचे कौतुक आणि शिवसेना नेतृत्वावर बोचरी टिका करण्याची एकही संधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडली नाही. त्यांच्या मनोगणात कौतुक शिंदेचे आणि टीकेचे धनी शिवसेनेचे नेतृ्त्व असेच राहिले.
बाळासाहेबांच्या विचारांचा प्रभाव
एकनाथ शिंदे यांचे कर्तुत्व हे शिवसेनेला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला शोभेल असे राहिले आहे. त्यांच्या विचाराचा वारसा खऱ्या अर्थाने शिंदे हेच चालवत असल्याचे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांनाच डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. किसननगर येथील शाखा प्रमुख ते आता मुख्यमंत्री या दरम्यानच्या प्रवासात शिंदे हे जनतेच्या मनातील ताईत राहिलेले आहेत. त्यांचे कर्तुत्व हे सर्वसामान्यांसाठीच होते. त्यामुळेच ठाणेच नाहीतर राज्यात त्यांची वेगळी ओळख झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने ते प्रभावित आहेत तर अनंद दिघे यांच्यामध्ये त्यांची जडणघड़ण झाली आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या विचार त्यांनी कायम ठेवल्याने हे आजचे परिवर्तन झा्ल्याचेही फडणवीस म्हणाले.
पक्ष नेतृत्वाकडून खच्चीकरण
प्रत्येक शिवसैनिकावर बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार राहिलेले आहेत. त्यामुळेच तळागळातील जनतेचे प्रश्न त्यांनी जवळून अनुभवले आहेत. जनतेच्या हाकेला त्यांनी कधीच अंतर दिले नाही. शिवसैनिकांची हीच खासियत असली तरी त्या पध्दतीने त्यांचा राजकीय प्रवास झाला नाही. वेळोवळी होत असलेले खच्चीकरण यामुळे हे नेतृ्त्व समोर येण्यास उशिर झाल्याचे म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे. मात्र, आता नव्याने शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण होईल अशी स्थिती झाली आहे. याचा फायदा सर्वसामान्य जनतेला देखील होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
सीमा प्रश्नाच्या आंदोलनानंतर राज्याला ओळख
एकनाथ शिंदे यांचे शाखा प्रमुखापासून कार्य सुरु झाले होते. स्थानिक पातळीवर त्यांचे मोठे योगदान राहिले असले तरी सीमा प्रश्नाच्या आंदोलनात त्यांची ओळख राज्याला झाली असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्या दरम्यानच्या काळात त्यांना कारावासही झाला होता. अशा सच्च्या शिवसैनिकाची कदर ही बाळासाहेब ठाकरे यांनी केली मात्र, त्यानंतर त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली नाही म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली.