Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या शपथपत्रात प्रॉपर्टीची लपवाछपवी आणि गोलमाल? कोर्टात याचिका दाखल, काय आहे नेमका मॅटर?

Maharashtra Political News Today : 2014च्या एकनाथ शिंदे यांच्या शपथपत्रात पत्नीकडे एक व्यावसायिक इमारत नसल्याचं म्हटलंय. पण 2019 मध्ये त्यांनी...

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या शपथपत्रात प्रॉपर्टीची लपवाछपवी आणि गोलमाल? कोर्टात याचिका दाखल, काय आहे नेमका मॅटर?
एकनाथ शिंदेImage Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 7:26 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) यांनी शिवसेनेत बंड केल्यापासून ते चर्चेत आहेत. आता एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पुण्यातील (Pune Court) प्रथमवर्ग न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेद्वारे एकनाथ शिेदे यांच्या निवडणूक शपथपत्रात गोलमाल असल्याचा आरोप करण्यात आलाय. निवडणुकीआधी (Maharashtra Political Crisis) दाखल केलेल्या शपथपत्रात एकनाथ शिंदे यांनी शेतजमीन, वाहनं, मालमत्ता आणि शिक्षणाविषयीच्या माहितीत लपवाछपवी केली आणि यात माहितीत तफावत आढळून आली आहे, असा आरोप करण्यात आला आहे. अभिजित खेडकर, डॉ. अभिषेष हरिसाद यांनी ही याचिका दाखल केलीये. वकील समीर शेख यांच्यामार्फत ही याचिका शिंदे यांच्याविरोधात दाखल करण्यात आली आहे.

2009, 2014 आणि 2019 या विधानसभा निवडणुकीत कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदेंनी निवडणूक लढवलेली होती. या निवडणुकांमध्ये सादर करण्यात आलेल्या शपथपत्रात तफावती आढळ्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे त्यांच्याविरोधातत याचिका दाखल करण्यात आलेली आहे.

याचिकेतून करण्यात आलेले आरोप

  1. शेत जमिनीचा खोळ
  2. गाड्यांच्या किंमतीत तफावर
  3. हे सुद्धा वाचा
  4. नोटरीच्या शिक्क्यामध्ये एक्स्पायरी डेट लपवल्याचा आरोप
  5. शिक्षण अकरावी पर्यंत, पण शाळा वेगवेगळ्या
  6. इमारत खरेदीची माहिती लपवली

शेत जमीन :

दैनिक सामनाने दिलेल्या वृत्तानुसार एकनाथ शिंदे यांनी 2009,2014च्या शपथपत्रात शेतजमीन नसल्याचं नमूद केलं. पण 2019 मध्ये त्यांच्या पत्नीने ठाणे जिल्ह्यातील चिखलगावात जमीन खरेदी केल्याचा उल्लेख आहे. चिखलगावच्या सर्वे नंबर 844,845 ही जमीन 6 ऑगस्ट 2009 मध्येच खरेदी केल्याचे नमूद केलेय. तर 2014,2019 मधीळ शपथपत्रात व्यवसाय, नोकरीच्या तपशिलामध्ये उत्पन्नाच्या स्त्रोतात शेतकरी अशल्याचं नमूद केलेलं नाही.

गाड्यांच्या किंमतीत लपवाछपवी :

  • 2014च्या शपथपत्रात आरमाडा गाडी आठ लाखाला खरेदी केल्याचं म्हटलं आहे. तर 2019 मध्ये हीच गाडी 96,720 रुपयांना खरेदी केल्याचं म्हटलंय.
  • 2014मध्ये स्कॉर्पिओ 11 लाख रुपयांना खरेदी केली होती. पण 2019 मध्ये हीच गाडी अवघ्या 1.33 हजार रुपयांना खरेदी केल्याचं दाखवलंय.
  • 2014मध्ये 6.96 हजार रुपयांना घेतलेल्या बोलेरोची किंमत 2019 मध्ये मात्र 1.89 हजार रुपयांना घेतल्याचं दाखवलंय.
  • 2014मध्ये एक टेम्पो 92,224 रुपयांना खरेदी केल्याचं त्यांनी म्हटलंय. पण 2019 मध्ये याच टेम्पोची किंमत त्यांनी 21,360 रुपये इतकी दाखवलीय.
  • 2014च्या शपथपत्रात 17.70 लाखाला खरेदी केलेली इनोव्हा कारची किंमत 2019मध्ये 6.42 लाख रुपयांत खरेदी केल्याचं त्यांनी शपथपत्रात म्टलंय.

अकरावी पर्यंतचं शिक्षण वेगवेगळ्या शाळेतून?

एकनाथ शिंदे यांचं शिक्षण अकरावी पर्यंत झालंय. मात्र त्यातही एक गडबड दिसून आलीये. 2009 साली त्यांनी आपल्या शपथपत्रात ठाण्याच्या मंगला हायस्कूल एन्ड ज्युनिअर कॉलेजमधून 1981 साली उत्तीर्ण झाल्याचं म्हटलंय. तर 2019च्या शपथपत्रामद्ये त्यांनी ठाण्यातील न्यू इंग्लिश हायस्कूलमधून 1981 साली अकरावी उत्तीर्ण झाल्याचं म्हटलंय.

प्रॉपर्टी लपवली?

2014च्या एकनाथ शिंदे यांच्या शपथपत्रात पत्नीकडे एक व्यावसायिक इमारत नसल्याचं म्हटलंय. पण 2019 मध्ये त्यांनी पत्नीकडे ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये 007 प्लॉट नंबर बी 51 इथं व्यावसायिक (कमरशिअल) इमारत 20 नोव्हेंबर 2002 रोजी खरेदी केल्याचं म्हटलंय. असं असताना त्यांनी 2014 मध्ये ही माहिती का लपवली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय.

दैनिक सामनाने दिलेल्या वृत्तानुसार, एकनाथ शिंदे यांनी 2014च्या शपथपत्रात हाऊस नंबर 5, लँडमार्क को.ऑ.हौ.सो.ली. फायनलप्लॉट नंबर 60, इस्टर्न एक्स्प्रेस ठाणे ही निवासी इमारत 1 कोटी 6 लाख 27 हजार 815 रुपयांना खरेदी केल्याचं म्हटलंय. तर 2019 मध्ये याच इमारतीची किंमत त्यांनी 1 कोटी 6 लाख 27 हजार 495 रुपये इतकी दाखवण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी 21 जूनला शिवसेनेविरोधात बंड पुकारलं होतं. सुरुवातीला ते काही आमदारांना घेऊन सूरतला गेले. त्याच दिवशी रातोरात ते गुवाहाटीला पोहोचले. शिवसेनेने महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडावं, अशी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांची प्रमुख मागणी आहे.

वाचा महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय घडामोडींची लाईव्ह अपडेट्स : इथे क्लिक करा. Eknath Shinde News, Maharashtra Politics LIVE

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.