Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत नेमकं काय घडतंय? ह्या 6 घडामोडींवर लक्ष असू द्या

Eknath Shinde Latest News : एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोण कोण नेते आहेत? त्यांना कुणा कुणाचा पाठिंबा आणि समर्थन आहे, याचीही चाचपणी केली जातेय.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत नेमकं काय घडतंय? ह्या 6 घडामोडींवर लक्ष असू द्या
मोठी राजकीय घडामोडीImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 10:46 AM

मुंबई : आनंद दिघेंनंतर ठाण्यात शिवेसेनेची (Thane Shiv sena) कमान एकहाती सांभाळलेल्या एकनाथ शिंदेंबाबत (Eknath Shinde) सगळ्यात मोठी बातमी मंगळवारी सकाळी येऊन धडकली. शिंदे नाराज असल्याच्या वृत्तानं महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं. त्यामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडालीय. नाराज होऊन गुजरातमध्ये (Eknath Shinde Gujarat) पोहोचलेले एकनाथ शिंदे नाराज का झाले, याच्या चर्चांना उधाण आलं. दरम्यानच, इकडे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या काही तासांनी एकनाथ शिंदेच्या नाराजीनाट्यानं शिवसेनाही धास्तावली. तर्कवितर्कांना उधाण आलंय. या पार्श्वभूमीवर नेमक्या कोणकोणत्या महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडींनी लक्ष वेधलंय, त्यावर एक नजर टाकुयात…

महत्त्वाच्या घडामोडी :

  1. शिवसेनेची बैठक : विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. आज ही बैठक होणार आहे. मात्र या बैठकीच्या आधीच एकनाथ शिंदेच्या नाराजीनं संपूर्ण महराष्ट्राचं लक्ष वेधलंय. एकनाथ शिंदेच्या नाराजीनाट्याच्या पार्श्वभूमीवरर शिवसेनेच्या बैठकीलाही महत्त्व प्राप्त झालंय. एकनाथ शिंदे हे या बैठकीला येणार की नाही, हेही पाहणं महत्त्वाचंय. दुपारी 12 वाजता शिवसेनेच्या बैठकीतं आयोजन करण्यात आलं होतं. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषदेही 12 वाजता होण्याची शक्यता वर्तवली जातेय. या दोन्ही घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आणि निर्णायक ठरणार आहेत.
  2. खासदारांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश : एकनाथ शिंदेच्या नाराजीनंतर शिवसेना सतर्क झाली आहे. शिवसेनेच्या खासदारांसह आमदारांनी मुंबई येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शिवसेनेचे नेतेही मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झालेत. तर काही नेते मुंबईत येण्यासाठी निघालेत. दगाफटका होऊ नये, यासाठी शिवसेनेच्या पक्षनेतृत्त्वाकडून खबरदारी बाळगली जातेय.
  3. हे सुद्धा वाचा
  4. नेत्यांना माध्यमांशी बोलायला मनाई : शिवसेनेच्या नेत्यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई केली आहे. कोणीही माध्यमांशी बातचीत करुन नये, अशा सूचना शिवसेनेच्या नेत्यांसह मंत्री आणि आमदारांनाही देण्यात आल्या आहेत. असं असलं तरी सकाळी नीलम गोऱ्हे यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचीत केली होती. एकनाथ शिंदे लवकरच समोर येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
  5. शिंदेंसोबत कोण कोण याची चाचपणी : एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोण कोण नेते आहेत? त्यांना कुणा कुणाचा पाठिंबा आणि समर्थन आहे, याचीही चाचपणी केली जातेय. एकनाथ शिंदे हे विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करुन गेल्यानंतर थेट गुजरातला गेले. तिथे त्यांच्यासोबत काही आमदार असल्याचंही बोललं जातंय. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाश शिंदे यांच्या सोबत असलेले काही आमदार नॉट रिचेबल असल्याचीही माहिती समोर आली आहे. अनेक आमदारांशी संपर्क होत नसल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. आता शिंदे यांच्या सोबत नेमकं कोण आहे आणि कोण नाही, यावरुन तर्क वितर्क लढवले जात आहेत.
  6. शिंदेंशी संपर्क करण्याचा प्रयत्न : दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना सातत्यानं संपर्क करण्याता प्रयत्न केला जातोय. विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेच्या कोणत्याही बड्या नेत्यानं प्रतिक्रिया दिलेली नव्हती. त्यामुळे शंका व्यक्त केली जात होती. अखेर एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या कोणत्याही नेत्यांच्या संपर्कात नसून ते कुणाचाही फोनही घेत नसल्याचं खात्रीलायक वृत्त समोर येतय. त्यामुळे चिंता शिवसेनेच्या गोटात अधिकच चिंता आहे. अजूनही त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगितलं जातंय. शिंदे हे विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर गुजरातच्या सूरतमध्ये गेले. तिथली ली मेरिडिअन या हॉटेलमध्ये ते थांबल्याचंही समोर आलंय.
  7. पवारांशी सातत्यानं संपर्क : महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झालीय. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यास त्याचा मोठा फटका महाविकास आघाडी सरकारला बसेल, यात शंका नाही. शरद पवारही सातत्यानं या सगळ्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असल्याचं कळतंय. पवारांनी सातत्यानं संपर्क ठेवत, या घडामोडींवर नजर ठेवली आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून सरकारला कोंडीत पकडण्याच सातत्यानं भाजपकडून प्रयत्न केला गेला होता. त्यातच केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्षही सगळ्यांनी पाहिला. मात्र राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकांमध्ये फडणवीसांनी बाजी मारली. त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे. अशा परिस्थिती एकनाथ शिंदेंनी बंड करणं, हे महाविकास आघाडीला परवडणार नाही. त्यामुळे शरद पवारही सतर्क झालेत.

नाराज एकनाथ शिंदेंच्या यांच्याशी निगडीत ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...