Eknath Shinde : मुंबईला राज्यपालांना भेटायला जातोय, सर्व आमदार सोबत; एकनाथ शिंदे यांचं पहिल्यांदाच सत्ता स्थापनेबाबतचं मोठं विधान

भाजप गटातील हलचालीनंतर आता शिंदे गटाचेही चित्र स्पष्ट होत आहे. त्यानुसारच भाजप आणि शिंदे गटाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याच अनुशंगाने काही पत्र ते राज्यपाल यांना देणार आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांची देखील ते भेट घेणार आहे. राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्ता स्थापनेचे चित्र काय असणार हे पहावे लागणार आहे.

Eknath Shinde : मुंबईला राज्यपालांना भेटायला जातोय, सर्व आमदार सोबत; एकनाथ शिंदे यांचं पहिल्यांदाच सत्ता स्थापनेबाबतचं मोठं विधान
एकनाथ शिंदेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 1:22 PM

मुंबई : गोवा येथे आमदारांसोबत बैठक पार पडल्यानंतर (Eknath Shinde) एकनाथ शिंदे हे आता मुंबईकडे रवाना झाले आहेत. आतापर्यंत सत्ता स्थापनेबद्दल स्पष्ट भूमिका शिंदे गटाने व्यक्त केली नव्हती. पण (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता चित्र स्पष्ट झाल्यानंतर राज्यपालांना भेटायला जात असल्याचे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर सांगितले तर मुंबईत आल्यावर सर्वात प्रथत ते राजभवनावर जाणार आहेत. एवढेच नाहीतर  (Mumbai) मुंबईत दाखल झाल्यावर एकनाथ शिंदे हे सर्वप्रथम राज्यपाल यांना भेटणार आहे. त्यामुळे आजच सत्ता स्थापनेचे चित्र स्पष्ट होणार आहे. भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्येही बैठक होणार असून यामध्येच मंत्री मंडळाचे गणित जुळवून घेतले जाणार का हे पहावे लागणार आहे.

फडणवीस अन् शिंदेमध्येही बैठक

भाजप गटातील हलचालीनंतर आता शिंदे गटाचेही चित्र स्पष्ट होत आहे. त्यानुसारच भाजप आणि शिंदे गटाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याच अनुशंगाने काही पत्र ते राज्यपाल यांना देणार आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांची देखील ते भेट घेणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर तर चर्चा होणारच आहे. यातूनच मंत्रीमंडळाचे चित्र समोर येणार का हे पहावे लागणार आहे. राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्ता स्थापनेचे चित्र काय असणार हे पहावे लागणार आहे.

दहा दिवसानंतर शिंदे मुंबईत

बंडखोर आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे हे 10 दिवसांपूर्वी सुरतला गेले होते. आता दरम्यानच्या काळातील घटनांनतर आता सत्तेचे समीकरण ठरले गेले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आज गोव्याहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे मुंबईत जागोजागी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे हे राज्यपालांना भेटून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही चर्चा करणार आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.