मुंबई : गोवा येथे आमदारांसोबत बैठक पार पडल्यानंतर (Eknath Shinde) एकनाथ शिंदे हे आता मुंबईकडे रवाना झाले आहेत. आतापर्यंत सत्ता स्थापनेबद्दल स्पष्ट भूमिका शिंदे गटाने व्यक्त केली नव्हती. पण (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता चित्र स्पष्ट झाल्यानंतर राज्यपालांना भेटायला जात असल्याचे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसमोर सांगितले तर मुंबईत आल्यावर सर्वात प्रथत ते राजभवनावर जाणार आहेत. एवढेच नाहीतर (Mumbai) मुंबईत दाखल झाल्यावर एकनाथ शिंदे हे सर्वप्रथम राज्यपाल यांना भेटणार आहे. त्यामुळे आजच सत्ता स्थापनेचे चित्र स्पष्ट होणार आहे. भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्येही बैठक होणार असून यामध्येच मंत्री मंडळाचे गणित जुळवून घेतले जाणार का हे पहावे लागणार आहे.
भाजप गटातील हलचालीनंतर आता शिंदे गटाचेही चित्र स्पष्ट होत आहे. त्यानुसारच भाजप आणि शिंदे गटाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याच अनुशंगाने काही पत्र ते राज्यपाल यांना देणार आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांची देखील ते भेट घेणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर तर चर्चा होणारच आहे. यातूनच मंत्रीमंडळाचे चित्र समोर येणार का हे पहावे लागणार आहे. राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्ता स्थापनेचे चित्र काय असणार हे पहावे लागणार आहे.
“MLAs are still here in Goa but I am going to Mumbai today,” says rebel Shiv Sena leader Eknath Shinde pic.twitter.com/edisLE8cU2
— ANI (@ANI) June 30, 2022
बंडखोर आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे हे 10 दिवसांपूर्वी सुरतला गेले होते. आता दरम्यानच्या काळातील घटनांनतर आता सत्तेचे समीकरण ठरले गेले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आज गोव्याहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे मुंबईत जागोजागी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे हे राज्यपालांना भेटून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही चर्चा करणार आहेत.