Eknath Shinde : उपाध्यक्षांना पाठवलेल्या एकनाथ शिंदेंच्या पत्रावर 37 आमदारांच्या स्वाक्षऱ्या! वाचा त्या आमदारांची संपूर्ण यादी

Vidhansabha Vice President narhari Zirwal : 23 जून रोजी पाठवण्यात आलेल्या एकनाथ शिंदे गटाच्या या पत्रावर सही करणारे 37 आमदार कोण आहेत, पाहूयात...

Eknath Shinde : उपाध्यक्षांना पाठवलेल्या एकनाथ शिंदेंच्या पत्रावर 37 आमदारांच्या स्वाक्षऱ्या! वाचा त्या आमदारांची संपूर्ण यादी
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 8:40 AM

मुंबई : बंडखोरी केल्याच्या तिसऱ्या दिवशी रात्री उशिरा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यपालांसह विधानसभा उपाध्यक्ष आणि विधानसभेच्या सचिवांना पत्र पाठवलं. आपण गटनेते असल्याचा दावा केला. तर भरतशेट गोगावले (Bharatshet Gogavale) प्रतोद असल्याचं म्हटलंय. एकनाथ शिंदे यांनी पाठवलेल्या या पत्रावर शिवसेनेच्या दोन तृतीआंश आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. याचाच अर्थ आता पक्षांतरबंदी कायद्याचं कोणतंही भय एकनाथ शिंदे यांना नसणार आहे. उलट उद्धव ठाकरेंच्या अडचणी या पत्रावरील 37 आमदारांच्या स्वाक्षऱ्यांनी वाढवल्या आहेत. त्यामुळे मुंबईत आता मातोश्रीवरील घडामोडींकडे सगळ्यांची नजर लागली आहे. शिवसेनेच्या दोन तृतीआंश आमदारांसोबत एकनाथ शिंदे यांच्या सहा अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे. त्यामुळे आता शिंदे गटाचं संख्याबळ वाढलं आहे.

23 जून रोजी पाठवण्यात आलेल्या एकनाथ शिंदे गटाच्या या पत्रावर सही करणारे 37 आमदार कोण आहेत, त्यावर एक नजर टाकुयात..

  1. एकनाथ शिंदे
  2. भरत गोगावले
  3. विश्वनाथ भोईर
  4. महेंद्र थोरवे
  5. शांताराम मोरे
  6. श्रीनिवास वनगा
  7. लता सोनवणे
  8. संजय शिरसाट
  9. ज्ञानराज चौगुले
  10. यामिनी जाधव
  11. शहाजी पाटील
  12. तानाजी सावंत
  13. शंभूराज देसाई
  14. महेश शिंदे
  15. प्रकाश सुर्वे
  16. संजय रायमुलकर
  17. महेंद्र दळवी
  18. संदीपान भुमरे
  19. रमेश बोरनारे
  20. बालाजी प्र किणीकर
  21. अब्दुल सत्तार
  22. प्रदीप जैस्वाल
  23. संजय गायकवाड
  24. चिमणराव पाटील
  25. अनिल बाबर
  26. सुहास कांदे
  27. प्रताप सरनाईक
  28. बालाजी कल्याणकर
  29. किशोर पाटील
  30. योगेश कदम
  31. दीपक केसरकर
  32. मंगेश कुडाळकर
  33. गुलाबराव पाटील
  34. सदा सरवणकर
  35. प्रकाश आविटकर
  36. दादा भुसे
  37. संजय राठोड

महाराष्ट्रातील सत्तेचं गणित आता कसं असेल?

एकनाथ शिंदे गटाला महाविकास आघाडीत राहायचं नाही. त्यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. उद्धव ठाकरे जोपर्यंत मविआतून बाहेर पडत नाही, तोवर आम्ही मुंबईत येणार नाही, असंही ते म्हणालेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी, काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंना सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. अशा वेळी आता नेमकी राजकीय समीकरणं काय तयार होतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

दुसरीकडे शिवसेनेकडून 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अरविंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. निलंबन करण्यात यावं, या मागणीसाठी करण्यात आलेल्या 12 आमदारांमध्ये नेमक्या कुणाकुणाची नावं आहेत, त्यावरही एक नजर टाकुयात…

  1. एकनाथ शिंदे (कोपरी)
  2. तानाजी सावंत (भूम-परंडा)
  3. संदीपान भुमरे (औरंगाबाद शहर)
  4. संजय शिरसाठ (औरंगाबाद पश्चिम)
  5. अब्दुल सत्तार (सिल्लोड)
  6. भरत गोगावले (महाड)
  7. प्रकाश सुर्वे (मागाठाणे)
  8. अनिल बाबर (सांगली)
  9. बालाजी किनीकर (अंबरनाथ)
  10. यामिनी जाधव (भायखळा)
  11. लता सोनावणे (चोपडा)
  12. महेश शिंदे (कोरेगाव)

एकनाथ शिंदेंसोबतच समर्थक आमदार शिवसेनेच्या पक्षादेशाचं उल्लंघन करत आहेत. त्या कारणामुळे त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे. तसं पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे देण्यातही आलं आहे.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.