Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: मोठी बातमी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची काल गुजरातमध्ये भेट, नव्या सत्ता समीकरणांची चर्चा

फडणवीस हेही रात्रीतून गुजरातमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. गुजरातमध्ये बडोद्यात ही भेट झाल्याचे सांगण्यात येते आहे. या बैठकीत राज्यात पुढे काय घडेल, सत्ता समीकरण यांची चर्चा झाल्याची शक्यता आहे.

Eknath Shinde: मोठी बातमी, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची काल गुजरातमध्ये भेट, नव्या सत्ता समीकरणांची चर्चा
Eknath Shinde and Devendra Fadanvis
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 6:27 PM

मुंबई – शिवसेनेत झालेल्या बंडखोरीने राज्यात सगळं राजकारण ढवळून निघालेलं असताना, एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांची काल रात्री गुजरातमध्ये भेट झाल्याची माहिती मिळते आहे. गुवाहाटीवरुन काल रात्री एकनाथ शिंदे गुजरातमध्ये (Gujrat)दाखल झाले होते. तर फडणवीस हेही रात्रीतून गुजरातमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. गुजरातमध्ये बडोद्यात ही भेट झाल्याचे सांगण्यात येते आहे. या बैठकीत राज्यात पुढे काय घडेल, सत्ता समीकरण यांची चर्चा झाल्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांचा रात्री अचानक गुजरात दौरा

एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशिरा हॉटेलमधून बाहेर पडले, त्यानंतर ते चार्टर प्लेनने गुजरातला गेले. तिथे त्यांची फडणवीस आणि भाजपाच्या बड्या नेत्यांशी भेटल्याची माहिती आहे. पहाटे पुन्हा ते हॉटेलमध्ये परतल्याची माहिती आहे. या बैठकीत पुढे राज्यात काय राजकारण घडणार, याची चर्चा यात झाली असण्याची शक्यता आहे. १६ आमदारांचे शिवसेना करत असलेले निलंबन, स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळण्यास होत असलेला उशीर या सगळ्या तांत्रिक बाबींवर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी काल दुपारी एकनाथ शिंदे हे वकिलांच्या टीमला भेटण्यासाठीही हॉटेलमधून बाहेर दोन तास गेल्याचीही माहिती आहे.

भाजपाशी पडद्याआड बोलणी सुरु

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजपाचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येते आहे. बंडखोर आणि भाजपा हे दोघेही हे नाकारत असले तरी प्रत्यक्षात घडामोडी या तशाच दिसतायेत. शिंदे बंडखोरांसाठी जी व्यवस्था अभी करण्यात आली आहे, त्यांना सूरत आणि गुवाहाटीत ज्या प्रमाणे पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे, त्यावरुन भाजपाचे बडे नेते, केंद्रीय नेतृत्व या बंडाच्या पाठीमागे असल्याचे मानण्यात येते आहे. एकनाथ शिंदे यांनीही त्याचा उल्लेख महासत्ता म्हणून एका व्हिडिओत केला आहे.

हे सुद्धा वाचा

आता पुढे काय होणार

लवकरात लवकर हा तिढा सुटावा यासाठी शिंदे आणि बंडखोर प्रयत्नात असण्याची शक्यता आहे. जर आमदारांवर कारवाई झाली, राज्यात बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर हल्ला होत राहिला तर राज्यपाल या प्रकरणात हस्तक्षेप करु शकतील. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा हा हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टातही जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत राज्यातील राजकारण अजून तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा आणि शिंदे गट असा हा संघर्ष येत्या काही काळात राज्यात पाहायला मिळणार आहे.

रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला
विरोधकांना काहीही काम उरलेलं नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला.
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं
शरण येण्याआधीच बीड पोलिसांनी रणजित कासलेला ताब्यात घेतलं.
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड
हिंदू आहोत, हिंदी नाही.. संघर्ष अटळ; राज ठाकरेंची आग पाखड.
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश
MPSC परिक्ष पुढे ढकलली, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू
बापावरून ठाकरे - शिंदे पेटले; वार पलटवार सुरू.
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.