Eknath Shinde News, Maharashtra Government LIVE मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) यांनी केलेल्या बंडखोरीने महाराष्ट्राच्या राजकारणाचं वातावरण गरम झालं. महाविकास आघाडी हादरली आहे. काल पर्यंत एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या आमदारांच्या संख्येचा जो आकडा सांगितला जात होता, त्यात अचानक आज भर पडली आहे. आता खुद्द एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे 40 आमदार (Eknath Shinde New Shiv sena) असल्याचा खळबळजनक दावा केलाय. त्यामुळे गरज असलेल्या 37 आमदारांपेक्षा जास्त आमदार हे एकनाथ शिंदेंना जमवण्यात यश आल्याचं त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालंय. सूरतमधून आसामच्या गुवाहाटीमध्ये सध्या सगळे आमदार पोहोचले. त्यामुळे आता शिवसेनेचे (Maharashtra Government Politics) बंडखोर आमदार हे जवळपास संपर्ख क्षेत्राच्या बाहेर गेल्यात जमा आहेत. अशातच सत्तेच जे गणित एकनाथ शिंदे जुळवू पाहत आहेत, ते नेमकं कसं आहे, हेही समजून घेणं गरजेचं आहे.
एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दुपारी ट्वीट करत आपली राजकीय भूमिका बंडखोरीच्या सगळ्या घडामोडींच पहिल्यांदा स्पष्ट केली. त्यांनी ट्वीट करत आपण कट्टर शिवसैनिक असल्याचं म्हटलं होतं.
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 21, 2022
त्यानंतर त्यांनी रात्री पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर येत आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार आपल्याला पुढे घेऊन जायचंय, त्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
त्यानंतर गुवाहाटी विमानतळावर पोहोचल्यानंतर आपल्याकडे 40 आमदार आहेत, असंही त्यांनी म्हटलंय. माझ्याकडचा गट हीच खरी शिवसेना असं एकनाथ शिंदे यांनी ठासून सांगितलंय. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय.
एकनाथ शिंदे आता मुंबईला जाणार असल्याचंही कळतंय. त्यानंतर ते राज्यपालांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदेनी केलेला दावा खरंच वास्तवात येणार का? हे दुपारपर्यंतचं चित्र स्पष्ट होणार.
वाचा एकनाथ शिंदेच्या बंडाचे LIVE अपडेट्स, इथे क्लिक करा : Eknath Shinde News, Maharashtra Government LIVE : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लु हॉटेलमध्ये राहण्याची सोय