“भाजपसोबत मंत्रिपदांबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका”, एकनाथ शिंदे यांचं आवाहन

Eknath Shinde : अफवांवर विश्वास ठेवू नका- एकनाथ शिंदे

भाजपसोबत मंत्रिपदांबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, एकनाथ शिंदे यांचं आवाहन
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 11:33 AM

मुंबई :  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केलं अन् आपल्या समर्थक आमदारांसह आधी सूरत मग गुवाहाटी आणि आता गोवा गाठलं. सरकार अल्पमतात आल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर फडणवीस सरकारच्या पुनर्स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. एकनाथ शिंदे आणि भाजप (BJP) एकत्र येत सरकार स्थापन करतील. पण त्याआधी एकनाथ शिंदे यांनी महत्वाचं ट्विट आहे. “भाजपसोबत मंत्रिपदांबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका”, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून शिंदे गटाच्या आमदारांसह राज्यातील जनतेला केलं आहे.

एकनाथ शिंदे यांचं ट्विट

मंत्रिपदं, खातेवाटप आणि भाजपसोबतची चर्चा याविषयी एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे. “भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका”, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

हे सुद्धा वाचा

पुन्हा बाळासाहेबांच्या विचारांचा दाखला

एकनाथ शिंदे यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा दाखला दिला आहे. “वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस”, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

मंत्रिपदाचा फॉर्म्युला काय असणार?

नव्या सरकारमध्ये मंत्रिपदे वाटपाचा फॉर्म्युलाही तयार करण्यात आला आहे. प्रत्येक सहा आमदारांमागे एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद देण्यात येणार आहे. मात्र, त्यात ऐनवेळी बदलही होऊ शकतो असंही सांगितलं जात आहे.

शिंदे गटाला विधानसभेचं उपाध्यक्षपद

शिंदे गटाला विधानसभेचं उपाध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता आहे. या पदासाठी दीपक केसरकर यांची वर्णी लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

अपक्षांना अधिकाधिक संधी

शिंदे गटासोबत तब्बल 11 अपक्ष आहेत. त्यात बच्चू कडू यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात येणार आहे. तसेच इतर एक दोन अपक्षांना मंत्रिपद देऊन बाकीच्यांना महामंडळ देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

गृहखात्यासाठी आग्रही

गृहखात्यासाठी शिंदे आग्रही होते. मात्र, ठाकरे सरकारमध्ये हे खातं राष्ट्रवादीच्या वाट्याला आलं. त्यामुळे आता फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद आणि गृहखातं शिंदे स्वत:कडे घेणार असल्याचं सांगितलं जातं. नगरविकास खात्याच्या बदल्यात गृहखाते द्यावे अशी शिंदे गटाची मागणी आहे. तर महसूल खात्यासाठीही शिंदे गट आग्रही असल्याचं सांगितलं जात आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.