आरोप प्रत्यारोपांना कामातून उत्तर देणार, रखडलेली कामं आता मार्गी लावतोय- एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच नंदुरबारमध्ये आले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
नंदुरबार : मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच नंदुरबारमध्ये (Nandurbar) आले. हेलिकॉप्टरने ते नंदुरबारमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार, दादा भुसे हे नेते उपस्थित होते. नगरपरिषदेच्या इमारतीचं लोकार्पण कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) नंदुरबारमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी जमलेल्या लोकांना संबोधित केलं. यावेळी ते विविध मुद्द्यांवर बोलले.
आमच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. मात्र आम्ही कामातून उत्तर देऊ, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.
फडणवीस सरकारने सुरु केलेले प्रकल्प पुढे अडीच वर्षे रखडले पण आता त्या सर्व प्रकल्प पुन्हा सुरु करतोय. जे शेतकरी वेळवर परत फेड करणारे आहेत. त्या शेतकऱ्यांना सरकारने मदत .केली अडीच हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. गणपती मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. त्यानंतर लोकांची दिवाळीही गोड केली. आम्ही जिकडे जिकडे जातो. तिथे लोकांचं प्रेम मिळतंय. हे सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे, असं शिंदे म्हणालेत.
धर्मवीर आनंद दिघे या पिचरमध्ये एक वाक्य होतं गद्दारांना माफी नाही. मात्र गद्दारी 2014ला झाली होती. आपण भाजपा शिवसेना म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो होता. मात्र निवडणूक झाल्यानंतर नवनवीन प्रतिक्रिया येऊ लागल्या. तेव्हा गद्दारी झाली होती, असं शिंदे यांनी म्हटलं.
मी मुख्यमंत्री पदासाठी हा निर्णय घेतला नाही. मी लोकांचा न्यायासाठी हा निर्णय घेतला आहे. मतदान राजा हुशार झाला आहे. मतदान करताना विचार करतो. त्यामुळे जनतेच्या मतांचा आदर करत आम्ही हा निर्णय घेतला. जनतेच्या मनातील भावनेचा आम्ही आदर केला, असं शिंदे म्हणाले.