पटोले म्हणाले, ‘सरकार बरखास्तीची मागणी करणार’, शिंदे यांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…
नाना पटोले यांच्या विधानाला एकनाथ शिंदे यांचं जोरदार प्रत्युत्तर, पाहा काय म्हणाले...
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकार बरखास्तीवर विधान केलं होतं. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांच्या विधानाला उत्तर दिलं आहे. ‘नाना पटोलेंचं विधान हास्यास्पद आहे’, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. दिवाळीनंतर सरकार बरखास्ताची मागणी करणार आहे, असं नाना पटोले म्हणाले होते. त्याला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे.
पटोले काय म्हणाले होते?
सध्याचं शिंदे-फडणवीस सरकार शेतकरी विरोधी आहे. पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अशात शिंदे सरकार त्यांना मदत करायला तयार नाही. त्यामुळे हे सरकार बरखास्त झालं पाहिजे. दिवाळीनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शिंदे सरकार बरखास्तीची मागणी करणार आहे, असं नाना पटोले म्हणाले होते.
महाराष्ट्रात होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांना शिंदे सरकारच जबाबदार आहे, असंही पटोले म्हणालेत.
अन्नदाता शेतकरी आज संकटात आहे. त्याला शिंदे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. हे सरकार कायम शेतकरी, कष्टकऱ्यांच्या पाठिशी उभं आहे. आताही आम्ही शेतकऱ्यांच्या पाठिशी आहोत.त्यांना आम्ही जरूर मदत करू. विरोधी पक्षाचं कामचं टीका करणं आहे. त्यामुळे नाना पटोलेंनी टीका केली. त्यांच्या टीकेला आम्ही कामाने उत्तर देऊ. नाना पटोले यांचं विधान हास्यास्पद आहे, असं एकनाथ शिंदे म्हणालेत.