Eknath Shinde : ठरलं! एकनाथ शिंदे उद्या मुंबईत येणार, ‘बॅगा पॅक करुन तयार राहा’ बंडखोरांना शिंदेंच्या सूचना
एकनाथ शिंदे यांनी गेल्या 9 दिवसांपासून बंड केलं होतं.
गुवाहाटी : एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) यांनी गुवाहाटीतील कामाक्षी देवीच्या मंदिरात प्रार्थना केली आणि त्यानंतर माध्यमांशी बाचतीत केली. आम्ही उद्या मुंबईत (Rebel MLA in Mumbai) पोहोचणार आहोत, अशी माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. बहुमत चाचणीसाठी आम्ही सर्व बंडखोर आमदार मुंबईत पोहोचणार आहोत, असं ते म्हणाले. इतर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्ही मुंबईत येऊ, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बहुमत सिद्ध करा, असं म्हटलंय. त्यामुळे आता विशेष अधिवेशन हे बोलण्यात आलं असून उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी बंडखोर आमदार चोख सुरक्षा व्यवस्थेत मुंबईत दाखल होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणतली ही सगळ्यात मोठी घडामोडी मानली जातेय.
बॅगा भरा, शिंदेंच्या सूचना
एकनाथ शिंदे यांनी गेल्या 9 दिवसांपासून बंड केलं होतं. एकनाथ शिंदे यांनी आजच बंडखोर आमदारांना आपल्या बॅगा भरण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर ते गुवाहाटीतील कामाक्षी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बाचतीत केली. यावेळी त्यांनी आपण मुंबईत केव्हा येणार आहोत, हे स्पष्ट केलं. बंडखोर आमदार मुंबईत यायला आता निघणार आहेत.
थोडक्यात पण महत्त्वाचं
- उद्या मुंबईत पोहोचणार- एकनाथ शिंदे
- उद्या मुंबईत पोहोचून बहुमत चाचणीच्या कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाणार- एकनाथ शिंदे
- आम्ही शिवसेनेचे आमदार आहोत, शिवसेनेच्या आमदाराच्या भूमिकेत अधिवेशनात पोहोचू
- उद्या महाराष्ट्रात विधानसभेत विशेष अधिवेशन बोलावलं, उद्याच बहुमत चाचणी पार पडणार
- बहुमत चाचणीनंतर बंडखोर आमदारांची बैठक होणार, त्यानंतर पुढील दिशा ठरवणार- शिंदे
- आमच्याकडे दोन तृतीआंशपेक्षा जास्त आमदार, आम्ही शिवसेनेचेच, शिंदेंचा पुनरुच्चार
महाविकास आघाडी सरकार कोसळणार?
एकनाथ शिंदे यांनी 39 शिवसेना आमदारांसह बंड केलंय. तर 9 अपक्ष आमदारही त्यांच्यासोबत होते. आता हे सगळे आमदार मुंबईला येण्यासाठी निघणार असून ते नेमके मुक्कामाला कुठे थांबतात, हे पाहणं महत्त्वाचंय. मुंबईऐवजी गुजरातच्या सूरत किंवा गोव्यामध्ये हे बंडखोर आमदार थांबण्याची शक्यता वर्तवली जातेय. मुंबईत जीवाला धोका असल्याची भीती आधीच बंडखोर आमदारांनी व्यक्त केलेली होती. त्यामुळे आता हे आमदार मुंबईच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य विधानसभा | सत्तेचं गणित |
---|---|
विधानसभेचे एकूण सदस्य | 288 |
दिवंगत सदस्य | 01 |
कारगृहात सदस्य | 02 |
सध्याची सदस्य संख्या | 285 |
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार | 39 |
आता सभागृहाची सदस्य संख्या | 285 |
बहुमताचा आकडा | 143 |
भाजपचं संख्याबळ | भाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172 |
मविआचं संख्याबळ | शिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111 |
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ? | भाजप (106)+ अपक्ष (27) = 133 |
शिंदे गटाने बंडखोरीने केल्यानं महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलेलं आहे. त्यामुळे नव्या सत्तेची समीकरणं नेमकी कशी असतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
आमदाराचं नाव | मतदारसंघ | |
---|---|---|
1 | एकनाथ शिंदे | कोपरी-पाचपाखाडी |
2 | भरत गोगावले | महाड |
3 | उदय सामंत | रत्नागिरी |
4 | संदीपान भुमरे | पैठण |
5 | गुलाबराव पाटील | जळगाव ग्रामीण |
6 | दादा भुसे | मालेगाव बाह्य |
7 | अब्दुल सत्तार | सिल्लोड |
8 | दीपक केसरकर | सावंतवाडी |
9 | शहाजी पाटील | सांगोला |
10 | शंभुराज देसाई | पाटण |
11 | अनिल बाबर | खानापूर |
12 | तानाजी सावंत | परांडा |
13 | चिमणराव पाटील | एरंडोल |
14 | प्रकाश सुर्वे | मागाठाणे |
15 | विश्वनाथ भोईर | कल्याण पश्चिम |
16 | संजय गायकवाड | बुलडाणा |
17 | प्रताप सरनाईक | माजीवडा |
18 | महेंद्र दळवी | अलिबाग |
19 | महेंद्र थोरवे | कर्जत |
20 | प्रदीप जयस्वाल | औरंगाबाद मध्य |
21 | ज्ञानराज चौगुले | उमरगा |
22 | श्रीनिवास वनगा | पालघर |
23 | संजय रायमूलकर | मेहेकर |
24 | बालाजी कल्याणकर | नांदेड उत्तर |
25 | शांताराम मोरे | भिवंडी ग्रामीण |
26 | संजय शिरसाट | औरंगाबाद पश्चिम |
27 | प्रकाश आबिटकर | राधानगरी |
28 | योगेश कदम | दापोली |
29 | सदा सरवणकर | माहिम |
30 | मंगेश कुडाळकर | कुर्ला |
31 | यामिनी जाधव | भायखळा |
32 | लता सोनावणे | चोपडा |
33 | किशोरी पाटील | पाचोरा |
34 | रमेश बोरनारे | वैजापूर |
35 | सुहास कांदे | नांदगाव |
36 | बालाजी किणीकर | अंबरनाथ |
37 | दिलीप लांडे | चांदिवली |
38 | आशिष जयस्वाल | रामटेक |
39 | महेश शिंदे | कोरेगाव |