Eknath Shinde Video: ‘बाळासाहेबांसाठी, हिंदुत्वासाठी…’ अचानक येत एकनाथ शिंदेंनी बाईट दिला आणि बातमीही दिली!
ज्या उद्देशाने शिवसेनेतील नाराज आमदारांनी हा निर्णय घेतला आहे त्यावर आजही बंडखोर आमदार हे ठाम आहेत. शिवाय यामधील एकही आमदार नाराज किंवा परत येण्याच्या मनस्थितीमध्ये नाही.बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आजही सर्वजण ठाम असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे. या दोन भूमिकेपासून वेगळे होणार नसल्याचेही ते म्हणाले आहेत.
मुंबई : राज्याचे राजकारण आता कोणते वळण घेणार या सर्वाच्या केंद्रस्थानी (Eknath Shinde) एकनाथ शिंदे गट आजही कायम आहे. एकनाथ शिंदे यांची भूमिकाच निर्णायक ठरणार आहे. असे असतानाच (Guwahati) गुवाहटी येथील हॉटेल परिसरात फेरफटका मारत असताना एकनाथ शिंदे हे कॅमेरामध्ये कैद झाले. एवढेच नाहीतर त्यांनी माध्यमासमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Balasaheb Thackarey) बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्वाच्या भूमिकेवर आजही आपण ठाम असल्याचे एकनाथ शिंदे यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे. बंड केले असले तरी अजून सर्वजण हे शिवसेनेमध्येच आहोत आणि शिवसेनेलाच पुढे घेऊन जाण्यासाठी हा लढा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे बंडाच्या पहिल्या दिवशीपासून ज्य उद्देशाने शिंदे गटाने हा निर्णय घेतला त्यावर ते आजही ठाम आहेत. शिवाय गटाची भूमिका हे अधिकृतपणे दीपक केसरकर मांडत असल्याची आठवण करुन देत त्यांनी अजूनही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यावा असेच सांगितले आहे.
निर्णयावर ठाम, लवकरच पुढची भूमिका ठरणार
ज्या उद्देशाने शिवसेनेतील नाराज आमदारांनी हा निर्णय घेतला आहे त्यावर आजही बंडखोर आमदार हे ठाम आहेत. शिवाय यामधील एकही आमदार नाराज किंवा परत येण्याच्या मनस्थितीमध्ये नाही.बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आजही सर्वजण ठाम असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे. या दोन भूमिकेपासून वेगळे होणार नसल्याचेही ते म्हणाले आहेत. एकीकडे दीपक केसरकर यांच्या माध्यमातून भूमिका मांडली जात असून यावर योग्य निर्णय न झाल्यास पुढची भूमिका ठरणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले आहे. त्यामुळे केसरकर एकीकडे मंगळवारची डेडलाईन देत असताना एकनाथ शिंदे यांनी पुढच्या भूमिकेबद्दल लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितल्याने राजकीय घडामोडींना वेग आलान आहे.
गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न
एकीकडे दीपक केसरकर हे भावनिक आवाहन करीत आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे आपण हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठीच आपण हे पाऊल उचलल्याचे सांगत आहेत. त्यामुळे मंगळवारची डेडलाईन शिंदे गटाकडून देण्यात आली असून आता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे काय निर्णय घेणार हे देखील तेवढेच महत्वाचे आहे. शिवाय येथील आमदार हे आनंदीत आहेत. उलट ते आपल्या संपर्कात असल्याचे म्हणत संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप यावेळे शिंदे यांनी केला.
मी आजही शिवसेनेत
मी आजही शिवसेनेत आहे. यात शंका नाही. बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाची भूमिका घेऊन आम्ही जात आहोत, असं सांगतानाच आमची पुढची भूमिका तुम्हाला सांगत राहू. आमच्या शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर आहेत. ते तुम्हाला वेळोवेळी आमची भूमिका सांगत राहतील, असंही त्यांनी सांगितलं.