Sharad Pawar : एकनाथ शिदेंना मुख्यमंत्रीपद हवं आहे, पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवारांनी तिन्ही पक्षांचा सत्तेचं समीकरण सांगितलं

Eknath Shinde Live News : आम्ही परत गेल्यावर आमच्या सहकाऱ्यांशी बोलू. इथली स्थिती पाहून काही ना काही मार्ग निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

Sharad Pawar : एकनाथ शिदेंना मुख्यमंत्रीपद हवं आहे, पत्रकारांच्या प्रश्नावर शरद पवारांनी तिन्ही पक्षांचा सत्तेचं समीकरण सांगितलं
ठाकरे सरकारसाठी पुढचे 24 तास वैऱ्याचे, शरद पवार दिल्ली सोडून मुंबईकडेImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 2:29 PM

दिल्ली : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषद घेत नाराज एकनाथ शिंदेवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिदेंना (Eknath Shinde Live News) मुख्यमंत्रीपद हवं आहे, असं विधान शरद पवार (Sharad Pawar on Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवारांनी तिन्ही पक्षांच्या सत्तेचं समीकरणही सांगितलं. ते दिल्ली बोलत होते. महाराष्ट्रात जे झालं ते जगाच्या समोर आहे, असं म्हणतानाच ही पूर्ण फसवणूक आहे, असा टोलाही पवारांनी लगावलाय. हा दुसऱ्यादा झालेला प्रकार असल्याचं शरद पवार म्हणालेत. आधीही आमचे आमदार हरयाणात ठवले होते, असं शरद पवार यावेळी सांगायला विसरले नाहीत. अडीच वर्षे सरकार नीट चाललं, तसंच राष्ट्रवादीचं एकही मत इकडे तिकडे गेलं नाही, असंही पवार यांनी बोलताना स्पष्ट केलंय..

विधान परिषदेत झालेल्या मतदानामुळे आमच्यात कोणी नाराज नाही, असं पवारांनी स्पष्ट केलं. आमच्या मित्रपक्षाचा एक उमेदवार निवडून येऊ शकला नाही. आम्ही परत गेल्यावर आमच्या सहकाऱ्यांशी बोलू. इथली स्थिती पाहून काही ना काही मार्ग निघेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनायचंय?

दरम्यान, मुख्यमंत्रीपदावर बोलताना शरद पवारांनी महत्त्वपूर्ण विधान केलंय. कोण बोललं असेल मला मुख्यमंत्री बनवा, पण शिवसेनेकडेच मुंख्यमत्रीपदाची जबाबदारी आहे. उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादीची आहे, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. मुख्यमंत्री बदलायचा असेल तर त्यांचा निर्णय आहे.

हे सुद्धा वाचा

मात्र उद्धव ठाकरेंचं नेतृत्व बदलण्याची आम्हाला गरज वाटत नाही, असंही शरद पवारांनी म्हटलंय. तसंच उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं नाही. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाची बैठक बोलावली आहे. दुपारी ते त्यांच्या नेत्यांशी चर्चा करतील. त्यानंतर त्यांच्याशी आम्ही बोलू. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे, असंही ते म्हणाले. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना आम्ही तिघे सोबत आहे. पण एक्झॅटली काय मुद्दा आहे. तो प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे शिवसेनेकडून कळवलं जात नाही. त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही, असंही ते म्हणालेत.

पाहा व्हिडीओ :

शरद पवार हे सध्या दिल्लीमध्ये असून महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय. एकीकडे एकनाथ शिंदे नाराज आहेत, तर दुसरीकडे शिवसेनेकडून बैठकाही घेतल्या जात आहेत.

सध्याचं सत्तेचं समीकरण काय?

  1. शिवसेना 55
  2. राष्ट्रवादी 53
  3. काँग्रेस 44
  4. अपक्ष+इतर 17
  5. भाजप 106

शिवसेनेच्या 35 आमदारांनी बंड केल्यास मविआ अल्पमतात येणार आहे. एकनाथ शिंदेंसोबत मविआने बंडखोरी केल्या संख्याबळ 134 होईल आणि सरकार पडेल.

नाराज एकनाथ शिंदेंच्या यांच्याशी निगडीत ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.