Eknath Shinde : ’56 वर्षांची शिवसेना बारामतीच्या वळचणीला बांधायचं काम संजय राऊतांनी केलं’, विजय शिवतारेंचा आरोप, शिंदे गटाला जाहीर पाठिंबा

शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस, राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले. तसंच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना बारामतीच्या वळचणीला बांधली अशी टीकाही शिवतारे यांनी केलीय आणि आपण शिंदे यांच्यासोबत असल्याचं शिवतारे यांनी जाहीर केलंय.

Eknath Shinde : '56 वर्षांची शिवसेना बारामतीच्या वळचणीला बांधायचं काम संजय राऊतांनी केलं', विजय शिवतारेंचा आरोप, शिंदे गटाला जाहीर पाठिंबा
विजय शिवतारेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 4:17 PM

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत मोठा भूकंप झाला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत 50 आमदार असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येतोय. सरकार अल्पमतात आल्याचा दावा करत भाजपनं राज्यपालांकडे सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जाण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केलीय. त्यानंतर राज्यपालांनाही 30 जुलै रोजी विशेष अधिवेशन बोलावलं आहे. अशावेळी पुण्यातील शिवसेनेला आता मोठा धक्का बसलाय. माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस, राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले. तसंच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना बारामतीच्या वळचणीला बांधली अशी टीकाही शिवतारे यांनी केलीय आणि आपण शिंदे यांच्यासोबत असल्याचं शिवतारे यांनी जाहीर केलंय.

‘आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत नाही’

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सोबत राहून सेनेचं नुकसान होतंय. हे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्यांनी उद्धव ठाकरेंना विनंतीही केली होती. या विनंतीला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शिवसेना संघटना वाटवणे ही भूमिका एकनाथ शिंदे यांची होती. मागच्या निवडणुकीत 52 मतदारसंघ असे आहेत जिथे शिवसेना क्रमांक दोनवर होती. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आम्ही संघर्ष केला. उद्धव ठाकरे यांना एक ठराव करुन पाठवत आहोत. आम्ही तुमच्यासोबत आहोत, पण काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत नाही. एकनाथ शिंदे यांची जी मानसिकता होती तिच आमची आहे. आम्ही शिवसेनेसोबतच आहोत. 51 आमदारांनी सांगूनही उद्धव ठाकरे चक्रव्यूहातून बाहेर पडत नाहीत. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत फारकत घ्यावी. माझा हा निर्णय स्वार्थासाठी अजिबात नाही. शिवसेना महाविकास आघाडीसोबत गेल्यानंतर प्रचंड अन्याय झालाय. हे दुष्टचक्र आहे, आमचं विमानतळ गेलं, गुंजवणीचं पाणी पळवलं गेलं.

‘संजय राऊतांनी शिवसेना बारामतीच्या वळचणीला बांधली’

56 वर्षांची शिवसेना बारामतीच्या वळचणीला बांधायचं काम संजय राऊतांनी केलं. उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावं लागणं हे आमच्यासाठी दु:खदायक आहे. संघटना टिकली पाहिजे म्हणून आम्ही हा निर्णय घेत आहोत. ही दु:खद घटना आहे, पण लोकांच्या हितासाठी एकनाथ शिंदे यांना हा निर्णय घ्यावा लागला आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत. सगळे तालुकाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, हे सगळे माझ्यासोबत आहेत. माझ्या मतदारसंघातील 100 टक्के लोक माझ्यासोबत आहेत. मी स्वत: 22 तारखेला उद्धव ठाकरे यांना व्हॉट्सअपवर पत्र पाठवून गुवाहाटीला जाऊन एकनाथ शिंदे यांना समजावून सांगतो असं सांगितलं होतं, पण मला प्रतिसाद मिळाला नाही, असं शिवतारे म्हणाले.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.