Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : बंडाच्या तिसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे बँकफूटवर खेळण्याच्या तयारीत! आता प्रत्येक क्षण महत्त्वाचा

शिंदे आजही बँकफूटवर खेळणार असल्याची माहिती आहे.

Eknath Shinde : बंडाच्या तिसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे बँकफूटवर खेळण्याच्या तयारीत! आता प्रत्येक क्षण महत्त्वाचा
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 9:58 AM

मुंबई :एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांच्या 37 पेक्षा जास्त आमदार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र शिंदे राज्यपालांना देणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, शिंदे आजही बँकफूटवर खेळणार असल्याची माहिती आहे. शिंदे गोवा किंवा मुंबईत (Mumbai) जाणार नसल्याची माहिती आहे. यामुळे पुन्हा एकदा शिंदे नेमकं काय करणार, असा प्रश्न निर्माण झालाय. अधिक माहितीनुसार दोन तृतीआंश शिवसेना (Shiv Sena) आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पक्षांतर बंदी कायद्याचा कोणताही परिणाम शिंदे यांच्यावर होणार नाही, हे स्पष्ट झालंय. मात्र, हे असलं तरी शिंदे आजही शांत राहणार असल्याचं कळते. त्यामुळे शिंदेंच्या बँटफूटवर खेळणार असल्याची बोललं जातंय. राज्यात घडणाऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक क्षण महत्वाचा मानला जातोय.

37चा आकडा गाठला?

शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदारांची संख्या वाढणार असून शिवसेनेला खिंडार पडत चाललंय तर दुसरीकडे शिंदे गटाला बळकटी मिळतेय. 37चा आकडा गाठण्यासाठी एकनाथ शिंदे गटाकडून प्रयत्न केले जातायत. आज पुन्हा 3 आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झाले असल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. यामुळे शिंदे 37चा आकडा गाठण्यात यशस्वी ठरणार असल्याची बोललं जातंय. शिंदे गटाकडून 37चा आकडा गाठल्यास त्यांच्यावर पक्षांतर्गत कायद्यानुसार कारवाई होणार नसून ते वेगळा गट स्थापन करू शकतात. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय. यातच आता एक माहिती समोर आलीय. महाराष्ट्रातील सहा आमदार नॉटरिचेबल असल्याची माहिती आहे. यामुळे आता हे आमदार एकनाथ शिंदे गटाला मिळणार का, हा देखील प्रश्न सध्या चर्चीला जातोय.

हे सुद्धा वाचा

तज्ज्ञ काय म्हणाले?

आता जी आकडेवारी समोर आली आहे त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी खेळ जिंकला, असं म्हणावं लागेल. पण हे आकडे सातत्यानं बदलत आहेत. त्यामुळे लगेच यावर भाष्य करता येणं कठीण असल्याचं ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक भारतकुमार राऊत यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे यांच्याकडे नेमका किती आकडा आहे, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. शिंदे यांनी यादी सादर केल्यानंतर नेमकं समीकरण स्पष्ट होईल. या यादीची पडताळणी केली जाईल. त्यानंतरच पुढील समीकरणं कशी होतात, यावर बोलणं संयुक्तिक ठरेल. आताच यावर भाष्य करणं घाईच होईल, असंही ते म्हणालेत.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.