Raj Thackeray : शिंदेसेना राज ठाकरेंच्या मनसेमध्ये प्रवेश करणार? ‘या’ 2 शक्यता ज्या कुणीच नाकारु शकत नाही!

Raj Thackeray on Ekanth Shinde : या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे (Eknath Shinde Raj Thackeray Call) यांच्या फोनवरुन चर्चा झाल्याचीही कुजबूज ऐकायला मिळतेय.

Raj Thackeray : शिंदेसेना राज ठाकरेंच्या मनसेमध्ये प्रवेश करणार? 'या' 2 शक्यता ज्या कुणीच नाकारु शकत नाही!
राज ठाकरे, एकनाथ शिंदेImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 7:15 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) यांनी बंडखोरी केल्यानंतर आता त्यांचा गट जोपर्यंत तयार होत नाही, तोपर्यंत पुढची राजकीय वाटचाल (Maharashtra Political Crisis) कठीण आहे. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे  गटाने तर शिवसेना न सोडण्याचा निश्चय केलेला होता. आम्ही शिवसैनिकच आहोत, असं बंडखोरी केलेल्या सगळ्या आमदारांनी एकीकडे म्हटलं होतं. तर दुसरीकडे इकडे मुंबईत मात्र बंडखोरी केलेल्या आमदारांविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसल्या. अशातच आता आपला गट अन्य कुठल्या पक्षात विलीन करण्याशिवाय एकनाथ शिंदे यांच्याकडे दुसरा पर्याय नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे (Eknath Shinde Raj Thackeray Call) यांच्या फोनवरुन चर्चा झाल्याचीही कुजबूज ऐकायला मिळतेय. विशेष म्हणजे आता एकनाथ शिंदे यांचा गट राज ठाकरेंच्या मनसेमधये प्रवेश करु शकतो, अशी शक्यता वर्तवली जातेय. तसे प्रयत्नही पडद्याआड सुरु असल्याचं बोललं जातंय.

फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत यावरच चर्चा?

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या बडोद्यात बैठक झाल्याची माहिती समोर आली होती. या बैठकीत शिंदे गट मनसेत प्रवेश करु शकतो का, या दृष्टीने चर्चा झालेली असू शकते, असं तर्क लढवला जातोय. कायदेशीर लढाईत वेळ लागू शकतो. ही बाब लक्षात घेऊन बंडखोर आमदार मनसेत प्रवेश करुन भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावा करु शकतात, असाही एक पर्याय उपलब्ध असल्याची माहिती जाणकारांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर दोन महत्त्वाच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.

शिंदे गट मनसेसोबत जाण्याच्या 2 शक्यता

  1. सेनेतील ज्येष्ठ नेत्यांसमोर भवितव्याचा प्रश्न : आदित्य ठाकरे यांना शिवसेनेचा भावी नेता म्हणून प्रोजेक्ट केलं जातंय. त्यात आपलं काय होणार, अशी शंका शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना सतावू लागली होती, अशी चर्चा आहे. राज ठाकरेंच्या बाबतीत सध्या तरी तसं नाही. सत्ता द्या, मी बदल घढजवून दाखवतो, अशी भूमिका राज ठाकरेंनी आपल्या सभेतून बोलून दाखवलेली होती. भाजपमध्ये जाण्याऐवजी मनसेत प्रवेश करुन भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली जास्त संयुक्तिक असू शकतात, असाही एक पर्याय असल्याचं बोललं जातं. शत्रूचा शत्रू, मित्र या म्हणीनुसार एकनाथ शिंदे गड मनसेत गेला तर आश्चर्य वाटायला नको.
  2. ठाकरेही सोबत आणि हिंदुत्वही : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरही हिंदुत्व आणि ठाकरेंवरील श्रद्धा ही बंडखोरांना सोडता येणार नाही. त्यासाठी राज ठाकरेंसोबत गेल्यात दोन गोष्टी एकाच वेळी बंडखोरांना साधता येणार आहेत. एक म्हणजे हिंदुत्व आणि दुसरं म्हणजे ठाकरे हे नाव! हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंसोबत आम्ही गेलो, असा युक्तिवादही शिंदे गट करु शकतो. एककीडे काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात स्पर्धा करण्यासाठी यापुढे शिवसेनेत मर्यादा येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर थेट भाजप प्रवेश करण्याऐवजी मनसे हा त्यातल्या त्यात सुरक्षित पर्यात असू शकतो का, याचीही चाचपणी गेली जाण्याची शक्यताय.

हे सुद्धा वाचा

वाचा एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडखोरीनंतरच्या राजकीय भूकंपाचे लाईव्ह अपडेट्स : Eknath Shinde vs Shiv sena Live

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.