NCP : एकनाथ शिंदेंच्या बंडात छेद कधी होणार? जयंत पाटलांनी तो क्षण नेमका सांगितला

Jayant Patil on Eknath Shinde : महाविकास आघाडीत शिवसेनेनं राहून नये, अशी ठाम भूमिका एकनाथ शिंदे गटाने घेतलीय.

NCP : एकनाथ शिंदेंच्या बंडात छेद कधी होणार? जयंत पाटलांनी तो क्षण नेमका सांगितला
काय म्हणाले नेमकं पाटील?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 12:57 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक (NCP Meeting) पार पडली. मुंबईत पार पडलेल्या या बैठकीत शरद पवारांच्या (Sharad Pawar on Mahavikas Aghadi) अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी महत्त्वपूर्ण खुलासे केलेत. महाविकास आघाडी सरकार पडू नये, यासाठी उद्धव ठाकरेंना राष्ट्रावादी काँग्रेस पूर्णपणे मदत करणार आहेत, असं ते म्हणाले. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde News) बंडाची कारणं आणि शिवसेनेच्या अंतर्गत वादाची आम्हाला माहिती नाही, असं ही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, बंडखोरी केलेले आमदार आज ना उद्या परततीलच. शिवसेना आमदार परतले की चित्र अधिक स्पष्ट होईल. त्यानंतरही आम्ही शिवसेनेसोबत आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असं त्यांनी नमूद केलंय. गेलेले आमदार परत येतील, असा विश्वास आम्हाला आजही वाटतोय. उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जी साद घातली आहे, त्याला सकारात्मक प्रतिसाद सर्व आमदार देतील, अशी खात्री आम्हाला वाटतेय, असं जयंत पाटील यांनी म्हटलंय.

बंड कसं शमेल?

एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळे प्रचंड नुकसान झाल्याचा आरोप केलाय. शिवसेनेचं खच्चीकरण आणि शिवसेनेचं नुकसान महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमुळ झालं. या मित्रपक्षांनी आपला फायदा करुन घेतला. शिवसेनेला डाववलं, अशी भावना आमदारांमध्ये असल्याचं शिंदे गटाचं म्हणणं आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत शिवसेनेनं राहून नये, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतलीय.

हे सुद्धा वाचा

टोकाची भूमिका घेतलेल्या एकनाथ शिंदे गटाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र असूनही आशेचा किरण दिसतोय. शिवसेनेचे गेलेले आमदार परतली आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नेतृत्त्व स्वीकारतील, असं सांगितलं जातंय. मात्र दुसरीकडे सरकार आम्ही शेवटपर्यंत पडू देणार नाही, असाही विश्वास जयंत पाटील यांनी बोलून दाखवला आहे. त्यामुळे शेवटपर्यंत लढत राहू आणि उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणारच आहोत, अशीही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी स्पष्ट केली. शरद पवार यांच्या घरी झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर ते बोलत होते. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांचं बंड शमवण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रयत्न नेमके कितपत यशस्वी होतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वर्षावरुन मातोश्रीकडे

दरम्यान, मुख्मयंत्री वर्षावरुन मातोश्रीत परतले आहेत. यावरही जयंत पाटील यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. आमच्या आग्रहासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षावर गेले होते. त्यांची मातोश्रीवरुन वर्षावर जाण्याची इच्छा पहिल्यापासूनच नव्हती, असंही त्यांनी म्हटलं आहे. कामासाठी सोयीचं जावं म्हणून ते वर्षावर गेले होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये रोखठोक बोलले. यानंतर त्यांनी थेट वर्षा बंगला सोडत मातोश्रीवर जाण्याचा निर्णय जाहीर केला. जाहीर केलेल्या निर्णयप्रमाणे ते रात्री उशिरा मातोश्रीवर परतलेही होते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.