Eknath Shinde : सुरतमधली नार्वेकर-शिंदे बैठक जवळपास तासाभरानंतर संपली, नार्वेकरांसमोर शिंदेंचे 3 प्रस्ताव

सूरतमधील लि मेरेडियन हॉटेलमध्ये नार्वेकर, फाटक आणि शिंदे यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. त्या बैठकीत शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. शिंदे यांनी नार्वेकर आणि फाटक यांच्यासमोर दोन प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत.

Eknath Shinde : सुरतमधली नार्वेकर-शिंदे बैठक जवळपास तासाभरानंतर संपली, नार्वेकरांसमोर शिंदेंचे 3 प्रस्ताव
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 6:26 PM

सूरत : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचं निशाण फडकावल्यानंतर राज्याच्या राजकारण मोठा भूकंप झालाय. अशावेळी शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar), रविंत्र फाटक सूरतमध्ये दाखल झाले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा निरोप घेऊन हे दोन्ही नेते शिंदे यांच्याकडे गेले होते. सूरतमधील लि मेरेडियन हॉटेलमध्ये नार्वेकर, फाटक आणि शिंदे यांच्यात जवळपास तासभर चर्चा झाली. त्या बैठकीत शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. शिंदे यांनी नार्वेकर आणि फाटक यांच्यासमोर दोन प्रस्ताव ठेवण्यात आले आहेत. त्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा भाजपसोबत सरकार स्थापन करा आणि गटनेतेपदी आपण कायम राहणार, असे ते प्रस्ताव असल्याची माहिती मिळत आहे.

शिंदेंकडून कोणते तीन प्रस्ताव?

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेत मोठा भूकंप पाहायला मिळाला. शिंदे यांच्यासोबत जवळपास 26 आमदार असल्याचं बोललं जात आहे. शिंदे यांचं बंड मोडित काढण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून केले जात आहेत. त्यासाठीच मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक हे शिंदे यांची भेट घेण्यासाठी सूरतमध्ये दाखल झाले. तिथे शिंदे यांच्यासोबत त्यांची तासभर बैठक झाली. या बैठकीतही शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपसोबत सरकार स्थापन करावं, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडावी आणि गटनेतेपदी आपण कायम राहणार, असा प्रस्ताव दिल्याची माहिती मिळतेय. आता शिवसेना शिंदे यांच्या पर्यायावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

गटनेते पदावरुनही शिंदे समर्थकांमध्ये नाराजी

दुसरीकडे गटनेते पदावरुन शिंदे यांची हकालपट्टी करण्यात आलीय. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, गटनेता निवडीसाठी वर्षावर झालेल्या बैठकीत पुरेसे आमदार उपस्थित नव्हते, असा दावा बंडखोर आमदारांकडून केला जातोय. त्यामुळे गटनेतेपदावरुनही शिंदे समर्थकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

वर्षा बंगल्यावर सर्वपक्षीय बैठक

इकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आलीय. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य महत्वाचे नेतेही उपस्थित असतील. तर शरद पवार हे दिल्लीत आहेत. ते रात्री 8 वाजता मुंबईत दाखल होतील, अशी माहिती मिळतेय. त्यामुळे आता महाविकास आघाडी काय भूमिका घेते हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे.  

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.