Thackeray Pawar Meet : शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची बैठक संपली, 2 तास खलबतं; पुढील रणनिती काय?

शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी आज मातोश्रीवर जात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मातोश्रीवर तब्बल 2 तास खलबतं झाली. या बैठकीनंतर शरद पवार मातोश्रीवरुन निघाले. मात्र त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं आहे.

Thackeray Pawar Meet : शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची बैठक संपली, 2 तास खलबतं; पुढील रणनिती काय?
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 8:47 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडाळीनंतर मोठी खळबळ माजली आहे. अशावेळी महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तीनही घटक पक्षांच्या नेत्यांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जातेय. सरकार वाचवण्यासाठी आता खुद्द शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत. शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी आज मातोश्रीवर जात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मातोश्रीवर तब्बल 2 तास खलबतं झाली. या बैठकीनंतर शरद पवार मातोश्रीवरुन निघाले. मात्र त्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं आहे. तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीत सरकारची पुढील रणनिती ठरल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

शरद पवार हे अजित पवार, जयंत पाटील आणि प्रफुल पटेल यांच्यासह संध्याकाळी साडे सहा वाजता मातोश्रीवर पोहोचले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह मातोश्रीवर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत उपस्थित होते. दोन तास चाललेल्या बैठकीत राज्यातीस सध्यस्थितीवर आणि महाविकास आघाडी सरकारसमोरील संकट कसं टाळता येईल. त्याचबरोबर बंडखोर आमदारांना कसा धडा शिकवता येईल, याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.

राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे शिवसेनेच्या पाठिशी

दरम्यान, आज दुपारी अजित पवार यांनी शरद पवारांसह आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली होती. तेव्हा बोलताना अजित पवार म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे राहण्यावर ठाम आहोत. बंडखोरी हा शिवसेनेतील अंतर्गत प्रश्न आहे. ते आमदार माझ्या पक्षातील नाहीत, त्यामुळे त्यांना सल्ला किंवा त्यावर त्यावर भाष्य करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी दिली.

मुख्यमंत्र्यांचे शिवसेना आमदारांकडे दुर्लक्ष झालं का?

काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सांभाळण्याच्या नादात शिवसेनेच्या आमदारांकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष झाले का, असे विचारले असता अजिबात नाही, असे उत्तर त्यांनी दिले. सुरुवातीचे काही दिवस मुख्यमंत्र्यांनी वर्षावरून काम पाहिले. त्यावेळी कामामध्ये कुठलाही अडथळा आला नाही. आताही ते तेथून कारभार करत असतील तर काहीच अडचण नाही. दरम्यान, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबद्दल माझ्याकडे काहीही माहिती नाही आणि ऐकीव बातम्यांवरून मी मत व्यक्त करत नाही, असंही अजित पवार म्हणाले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.