Eknath Shinde : ‘आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक, तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही’ एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

'12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत', असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलंय.

Eknath Shinde : 'आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक, तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही' एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 10:44 PM

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडानंतर शिंदे यांच्यासह 12 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आलीय. अरविंद सावंत (Arvind Sawant) आणि अजय चौधरी यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेतली. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना प्रत्युत्तर दिलंय. ’12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत’, असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलंय

‘कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत. 12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत. कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे’, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिलंय. तसंच उद्धव ठाकरेंकडे असलेल्या आमदारांवरच कारवाईचा इशारा दिलाय.

शिवसेनेकडून शिंदे गटातील 12 बंडखोर आमदारांवर कारवाईची मागणी

बंडाळीनंतर आता बंडखोर आमदारांना धडा शिकवण्यासाठी शिवसेनेकडून खेळी करण्यात आलीय. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार किंवा तो गट शिवसेना पक्षादेशाचं उल्लंघन करत आहेत. त्यामुळे त्यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात यावं अशी मागणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यासाठी शिवसेना खासदार अरविंद सावंत, नवनियुक्त गटनेते अजय चौधरी अजून काही आमदार आणि नेते यांच्या शिष्टमंडळानं विधानसभा उपाध्यक्षांची भेट घेटली आहे. शिवसेनेकडून एकूण 12 आमदारांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे.

कुणाची आमदारकी रद्द करण्याची मागणी?

>> एकनाथ शिंदे (कोपरी)

>> तानाजी सावंत (भूम-परंडा)

>> संदीपान भुमरे (औरंगाबाद शहर)

>> संजय शिरसाठ (औरंगाबाद पश्चिम)

>> अब्दुल सत्तार (सिल्लोड)

>> भरत गोगावले (महाड)

>> प्रकाश सुर्वे (मागाठाणे)

>> अनिल बाबर (सांगली)

>> बालाजी किनीकर (अंबरनाथ)

>> यामिनी जाधव (भायखळा)

>> लता सोनावणे (चोपडा)

>> महेश शिंदे (कोरेगाव)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.