Eknath Shinde: ठाण्यापासून औरंगाबाद महापालिकाही हातची जाणार; शिंदेंचं बंड कायम राहिल्यास शिवसेनेचं या जिल्ह्यात होणार पानीपत

राज्यपातळीवर आमदारांची अशा प्रकारे नाराजी उफाळून आल्यानंतर ग्रामीण पातळीवरील पक्षातही उभी फूच पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महापालिका निव़डणुकांसोबतच अनेक जिल्ह्यांतील अनेक पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत.

Eknath Shinde: ठाण्यापासून औरंगाबाद महापालिकाही हातची जाणार; शिंदेंचं बंड कायम राहिल्यास शिवसेनेचं या जिल्ह्यात होणार पानीपत
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 6:31 PM

मुंबईः ठाण्यातील ज्येष्ठ नेते आणि शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडामुळे अवघा महाराष्ट्र वेठीस धरलाय. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीला  (Mahavikas Aghadi) मोठा हादरा बसलाच आहे. सरकार पडेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. फक्त हाच धक्का नाही तर शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला येत्या काळात अनेक दिवस हे धक्के सहन करावे लागू शकतात. कारण मुंबईसह ठाणे (Thane Municipal Corporation), नाशिक, औरंगाबाद आदी महत्त्वाच्या ठिकाणी आगामी काळात महापालिका निवडणुका आहेत. राज्यात पहिल्या टप्प्यातील 14 महापालिकांच्या निवडणुकांची तर जय्यर तयारी सुरु झाली आहे. पण विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंनी 30 ते 35 आमदारांच्या पाठिंब्यानं उगारलेलं बंडाचं हत्यार शिवसेनेच्या वर्मी बसणार, असंच दिसतंय. एवढे आमदार शिवसेनेतून फुटण्यापासून वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी काही प्रस्ताव शिवसेनेसमोर ठेवले आहेत. महाविकास आघाडी सरकार की आमदार, यापैकी काय वाचवायचं, या धर्मसंकटात शिवसेना सापडली आहे. निश्चित शिवसेनेला अनेक ठिकाणी नमतं घ्यावं लागण्याची शक्यता आहे. पण या घडामोडींमुळे शिवसेनेच्या महाराष्ट्रातील राजकीय अस्तित्वावर संकट उभं राहणार हे नक्की.

शिवसेनेचे अनेक गढ, मनपात काय होणार?

महाविकास आघाडी सरकारला मोठं भगदाड पडल्यानंतर महापालिका निवडणुकांमध्येही शिवसेनेविरोधातील नाराजी उफाळून येणार की काय अशी चर्चा आहे. आगामी काळात ठाणे महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका, कुळगाव बदलापूर नगरपरिषद, अंबरनाथ नगरपरिषद, औरंगाबाद अशा प्रमुख ठिकाणच्या महापालिका निवडणुका होणार आहे. यापैकी काही तर शिवसेनेचे गड मानले जातात. आज एकनाथ शिंदेंच्या बंडासमोर नमतं घेतलं तर महापालिका निवडणुकांणध्येही शिवसेनेला बॅकफूटवर जावं लागणार हेही पहावं लागेल.

ग्रामीण भागातूनही बंडखोरी उफाळणार?

राज्यपातळीवर आमदारांची अशा प्रकारे नाराजी उफाळून आल्यानंतर ग्रामीण पातळीवरील पक्षातही उभी फूच पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महापालिका निव़डणुकांसोबतच अनेक जिल्ह्यांतील अनेक पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. इथेही पक्षांतर्गत बंडाळी उफाळली तर इथेही शिवसेनेला सत्ता गमावावी लागणार. तसेच सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद, बुलडाणा, यवतमाळमधील जि.प. न.प मधील सत्तेला नख लागण्याची शक्यता आहे.

'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.