Maharashtra Politics | फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, मी उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंचा शिवसेनेला प्रस्ताव, सुत्रांची माहिती

| Updated on: Jun 21, 2022 | 5:01 PM

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे एकनाथ शिंदे यांनी तडजोडीकरिता मोठा प्रस्ताव ठेवला आहे.

Maharashtra Politics | फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, मी उपमुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंचा शिवसेनेला प्रस्ताव, सुत्रांची माहिती
राजकीय वातावरण तापलं
Image Credit source: tv9
Follow us on

बईः शिवसेनेविरोधात पुकारलेल्या बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी तडजोडीकरिता मोठा प्रस्ताव ठेवला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री झालो पाहिजे, अशी मागणी एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) केल्याची माहिती हाती आली आहे. महाविकास आघाडी सरकारमधून बंड करून सूरतला पोहोचलेले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसमोर तीन प्रस्ताव ठेवले आहेत. हे प्रस्ताव शिवसेनेनं मान्य केले तरच आपली नाराजी दूर होईल, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे. एकनाथ शिदे यांच्या संपर्कात राज्यभरातील अनेक आमदार असून काही आमदार सूरतमध्ये तर काही मुंबई आणि परिसरात असल्याची चर्चा आहे. कालच्या विधान परिषद निवडणुकीनंतर महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींना वेग आला असून यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आलंय. आता एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसमोर ठेवलेल्या प्रस्तावावर विचार केला जाईल का, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

एकनाथ शिंदेंचे प्रस्ताव काय?

  •  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत
  • मी (एकनाथ शिंदे) उपमुख्यमंत्री व्हावेत
  •  शिवसेनेनं भाजपसोबत सरकार स्थापन करावं
  • आम्ही सर्व आमदार शिवसेनेतच राहणार

सरकार वाचवायचे की आमदार?

मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे सरकार चहुबाजूंनी घेरलं गेलं आहे. आता एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असलेले 30 ते 35 आमदार वाचवायचे की महाविकास आघाडी सरकार वाचवायचं, याचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारला घ्यावा लागणार आहे. शिवसेनेच्या वतीनं एकनाथ शिंदे यांची तसेच त्यांच्या संपर्कातील आमदारांची मनधरणी करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. महाविकास आघाडीतील मंत्र्यांचीही यासाठी मदत घेतली जात आहे. मात्र एकनाथ शिंदेंच्या याप्रस्तावानंतर शिवसेना चहुबाजूंनी घेरली गेली असून आता भाजपसोबत सरकार स्थापन करण्याची वेळ शिवसेनेवर येते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

संजय राठोड सूरतला जाणार

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान संजय राठोड हे शिवसेना नेते मध्यस्थी करणार आहेत, अशी माहिती पुढे आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानावर झालेल्या बैठकीनंतर संजय राठोड यांना उद्धव ठाकरेंचा निरोप घेऊन सूरतला पाठवले जात आहे. संजय राठोड आणि एकनाथ शिंदे यांच्यात एक बैठक होईल आणि शिंदे संध्याकाळी आपला अंतिम निर्णय घोषित करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.