Eknath Shinde Update: शिंदेंची आत्ताची तीन मोठी वक्तव्य! 45ची फौज, हिंदुत्वविरोधी पक्षांना स्पष्ट नकार म्हणजे… काऊंटडाऊन सुरू?

सध्या आसामची राजधानी गुवाहटी येथे असलेल्या एकनाथ शिंदे यांनी टीव्ही 9 शी फोनवरून प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेत त्यांनी तीन महत्त्वाची वक्तव्य केली. त्यावरून त्यांच्या मनातील पुढील रणनीती काय असेल याचे आडाखे सहज बांधता येतात.

Eknath Shinde Update: शिंदेंची आत्ताची तीन मोठी वक्तव्य! 45ची फौज, हिंदुत्वविरोधी पक्षांना स्पष्ट नकार म्हणजे... काऊंटडाऊन सुरू?
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 9:36 AM

मुंबईः हिंदुत्वाचा आणि बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) घडवलेल्या शिवसेनेचा मुद्दा पुढे करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बुधवार सकाळपासून आपली पुढील रणनीती हळू हळू स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. आम्हाला शिवसेना सोडायची नाही आणि हिंदुत्वाची (Hindutwa) भूमिका पुढे न्यायची आहे. या मुद्द्यांवर आम्ही ठाम असून शिवसेनेशी अद्यापपर्यंत आम्ही कधीही गद्दारी केलेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. सध्या आसामची राजधानी गुवाहटी येथे असलेल्या एकनाथ शिंदे यांनी टीव्ही 9 शी फोनवरून प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेत त्यांनी तीन महत्त्वाची वक्तव्य केली. त्यावरून त्यांच्या मनातील पुढील रणनीती काय असेल याचे आडाखे सहज बांधता येतात.

कोणती तीन वक्तव्य?

  1. मी शिवसेना सोडली नाही-

एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी दिलेल्या प्रतिक्रियेतही एकच मुद्दा स्पष्टपणे लावून धरला. मी शिवसेना सोडलेली नाही. त्यामुळे शिवसेनेतून ते बाहेर पडण्याच्या शक्यता फार कमी आहेत. मग एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील आमदारांना घेऊन मोठी उलथापालथ करण्याची रणनीती असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  2- हिंदुत्वाचा विचार पुढे नेणार 

हिंदुत्वाचा विचार पुढे नेणार, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे. याचा अर्थ काढायचा झाल्यास भाजप या हिंदुत्ववादी पक्षासोबत पुढील डावपेच आखले जातील, अशी शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावर अनेकदा प्रश्नचिन्ह उभं केलं गेलंय. त्यांच्या सध्याच्या धोरणांमध्ये हिंदुत्व उरलच नाही, असे आरोपही केले गेलेत. त्यातच आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेले शिवसैनिक असून हिंदुत्वाशी कधीही प्रतारणा करणार नाहीत, असंही शिंदे यांनी ठामपणे सांगितलंय.

3 सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड नाही

सत्तेसाठी हिंदुत्वासाठी कदापि तडजोड करणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी निक्षून सांगितलं आहे. आज आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे आमदार एकत्र आलो आहोत. विकासाचं राजकारण आणि बाळासाहेबांचं हिंदुत्व यावरच पुढील रणनीती आखली जाईल, असं ही शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. हिंदुत्वासाठी तडजोड नाही, याचा अर्थ महाविकास आघाडीतील इतर पक्षांसोबत राहण्याची शिंदेसेनेची इच्छा नाही. यातूनही भाजपसोबत मोट बांधण्याच्या तयारीत शिंदे असल्याचं स्पष्ट होतंय.

संजय राऊतांची सकाळची प्रतिक्रिया काय?

एकनाथ शिंदे भाजपसोबत जाणार असल्याची चिन्ह दिसत असताना संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ शिवसेना अटीशर्थींवर चालत नाही. 25 वर्षांपासूनची भाजपसोबतची युती तोडावी लागली. कशा प्रकारे शिवसेनेचा अपमान करण्यात आला. अनेक गोष्टी एकनाथ शिंदेंना माहिती आहे. ते साक्षीदार आहेत. कशा प्रकारे शिवसेनेचा वारंवार अपमान करत आले आहेत, हे त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे आता नवीन काहीही मी सांगू शकत नाही…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.