Eknath Shinde News, Maharashtra Government LIVE : आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाराष्ट्राचं राजकीय (Maharashtra Political Crisis) वातावरण ढवळून निघालं आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाचा आजचा आठवा दिवस आहे. 21 जून रोजी रातोरात आमदार सूरतला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते गुवाहाटीला रातोरात दाखल झाले. तेव्हा पासून गुवाहाटीच्या रिडेसन ब्लू हॉटेलात या आमदारांचा मुक्काम आहे. महाविकास आघाडी सरकारमधून (MVS vs BJP) बाहेर पडा, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्त्वाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी बंड केल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. सुरुवातील एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या समर्थनाची संख्या पुढे पुढे वाढत गेली. आपल्याकडे 50 आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यापैकी 38 शिवसेना आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये आहेत. तर यात 9 अपक्ष आमदारही आहेत.
शिवसेनेचे कोण कोण आमदार सोबत?
राज्यपालांना ईमेलद्वारे आणि प्रत्यक्षात पत्र दिले आहे. शिवसेनेचे 39 आमदार बाहेर आहेत. काँग्रेस, राष्ट्रावादीसह आम्हाला रहायचं नाही अशी यांची भूमिका आहे. या 39 आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी केली राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गटाच्या सत्ता स्थापनेच्या संघर्षात भाजप नेते देवेंद्र फडवीस आणि राज्यपालांची थेट एन्ट्री झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी केली राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे.सरकार अल्पमताता असल्याने बहुमत चाचणीची मागणी फडणवीस यांनी केली आहे. बंडखोर आमदांरांच्या याचिकेची प्रत राज्यपालकांडे दिली जाईल. या याचिकेत शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे नमूद केले आहे.
शिंदे गटाला देखील बहुमत चाचणीत मतदान करण्याचा हक्क असल्याचे विधीतज्ञ अनंत कळसे यांनी म्हंटले आहे. सध्याचे उपाध्याक्षांच्या अधिपत्याखाली ही बहुमत चाचणीची प्रक्रिया पार पडले. हा विश्वास दर्शक ठरावाचा मुद्दा असून त्यामुळे सभागृहात अडचण येणार नाही.
राज्यातील सत्तासंघर्षात मोठा क्लायमेक्स आला आहे. ठाकरे सरकारा अग्निपरीक्षा द्यावीच लागणार आहे. महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करावी लागणार आहे. या संदर्भात राज्यपालांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गटाच्या सत्ता स्थापनेच्या संघर्षात भाजप आणि राज्यपालांची थेट एन्ट्री झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी केली राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. सरकार अल्पमताता असल्याने बहुमत चाचणीची मागणी फडणवीस यांनी केली आहे. बंडखोर आमदांरांच्या याचिकेची प्रत राज्यपालकांडे दिली जाईल. या याचिकेत शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे नमूद केले आहे.
सत्ता स्थापनेच्या संघर्षात भाजप आणि राज्यपालांची थेट एन्ट्री सरकार अल्पमताता असल्याने बहुमत चाचणीची मागणी केली जाणार असल्याचे समजते. बंडखोर आमदांरांच्या याचिकेची प्रत राज्यपालकांडे दिली जाईल. या याचिकेत शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे नमूद केले आहे.
देवेंद्र फडणवीस राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल. भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झालया आहेत. दिल्लीतून मुंबईत दाखल झाल्यानंतर ते राजभवन येथे पोहचले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी भाजपची अत्यंत महत्वाची बैठक झाली. नड्डा, अमित शाहांसोबत फडणवीस यांची 30 मिनीटे चर्चा झाली असल्याचे समजते. 29 भाजपाचे आमदार मंत्री, 13 मंत्री – 8 कॅबिनेट-5 राज्यमंत्री – शिंदे गटाला मिळू शकतात असा भाजपचा सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देऊ नये अशी आग्रही मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जे. पी. नड्डा आणि अमित शहा यांची भेट घेवून कारवायांचा प्लॉट घडवतात असा गंभीर आरोप काँग्रेस नेते पृत्वीराज चव्हाण यांनी केला.
शिवसेना आमदारांची मातोश्री निवासस्थानी अत्यंत महत्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व आमदारांसह वन टू वन चर्चा करणार असल्याचे समजते. सुभाष देसाई, अनिल परब, रविंद्र वायकर, मिलींद नार्वेकर, विनायक राऊत, अजय चौधरी आदी पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत.
मुंबईत सत्ताबदलाच्या घडामोडी सुरु
देवेंद्र फडणवीस मुंबईत दाखल
फडणवीस राजभवनाकडे जात असल्याची माहिती
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार
मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक
मुख्यमंत्री पदाधिकाऱ्यांशी करणार चर्चा
एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं,नाल्याचीघाण,रेडा,कुत्रे,जाहील व मृतदेह म्हणायचे,त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय? अस ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून शिंदे यांनी थेट आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांवर टीका केली आहे.
एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं,नाल्याचीघाण,रेडा,कुत्रे,जाहील व मृतदेह म्हणायचे,त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय?#donttrickmaharashtra
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 28, 2022
मंत्र्यांनी आणि आणि सचिवांनी कामं थांबवू नयेत. कॅबिनेटमध्ये याबाबत चर्चा झाली. राज्यपालांनी माहिती मागीवली आहे. मात्र स्थिगीती दिलेली नाही.
उद्या औरंगाबादचा नाव संभाजीनगर करावं अशी शिवसेनेची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. उद्याच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या निर्णय होणार असल्याचे मंत्री अनिल परब यांनी सांगीतले. कॅबिनेटच्या बैठकीत राजकीय विषयांवर चर्चा होत नाहीत असं म्हणत मंत्री अनिल परब यांनी बंडखोरांबाबत बोलण टाळलं.
कॅबिनेटच्या बैठकीत राजकीय चर्चा झाली नाही असं स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. अजेंड्याबाबतची चर्चा या बैठकीत झाली. काही महिन्यांपूर्वी दोन टप्प्प्यात पोलीस भरतीचा निर्णय घेतला होता. पहिल्या टप्प्यातील झाली असून दुसऱ्या टप्प्यातील ७,५०० पोलीस भरती करण्याबाबत दुरुस्ती करण्यात आली. त्वरीत पोलीस भरती करण्याचा निर्णय पोलीस विभागाने घेतला आहे. लवकरच ही पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे वळसे पाटील यांनी सांगीतले.
शिवसेना आमदारांची मातोश्री निवासस्थानी अत्यंत महत्वाची बैठक होणार. सायंकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे. या सर्व आमदारांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वन टू वन चर्चा करमार असल्याचे समजते.
युती तोडून भाजप सोबत युतीचा निर्णय एका दिवसात घ्यावा दिपक केसरकर यांची मागणी. भाजप सोबत युती करण्याबाबत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींशी चर्चा करावी. शेवट गोड करा अशी आमची कळकळीची विनंती असल्याचे केसरकर म्हणाले. सुरक्षेसाठी आम्ही गुवाहाटीत येऊन राहिलोय
राजकीय चर्चा गुवाहाटीत सुरु असल्याचे मंत्री अस्लम शेख म्हणाले. बंडखोरांबाबत ते मुंबईत आल्याशिवाय काय बोलणार असंही ते म्हणाले. आजच्या मंत्री मंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील विविध समस्यांबाबत चर्चा झाली. उद्याही मंत्रिमंडळ बैठक होण्याची शक्यता आहे. मुंबई, महाराष्ट्रात पावसाबाबतची चर्चा केली तसेच महाराष्ट्रातील कोविड केसबाबत चर्चा झाली.
ठाकरे सरकार बहुमत चाचणीला सामोरे जाणार. आपलेच लोक आपल्याविरोधात मतदान करणार का, हे पाहायचे आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस दिल्लीतून मुंबईकडे निघाले. महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग असून दिल्लीत याबाबत हालचाली झाल्या. देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी भाजपची अत्यंत महत्वाची बैठक झाली. नड्डा, अमित शाहांसोबत फडणवीस यांची 30 मिनीटे चर्चा झाली असल्याचे समजते. 29 भाजपाचे आमदार मंत्री, 13 मंत्री – 8 कॅबिनेट-5 राज्यमंत्री – शिंदे गटाला मिळू शकतात असा भाजपचा सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला आहे.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली. जो निर्णय घ्याल तो मान्य असेल अशी भूमिका मंत्र्यांनी मांडली. अनेक मंत्री न बोलता निघून गेले. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकांकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
या बैठकीत सर्व मंत्रिमंडळाने उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शवला आहे. तुम्ही जी भूमिका घ्याल ती मान्य असेल असे त्यांनी सांगितले. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याची तयारीही दर्शवण्यात आली आहे. सरकार-प्रशासन चालू आहे हे दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचे सरकार सुरु आहे, हे दाखवण्याचा हा प्रयत्न मानण्यात येतो आहे.
तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल असं म्हणत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचे जाहीर केले आहे.
राज्य मंत्री मंडळाची बैठक सुरु झालेली आहे. या बैठकीत काय होणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहेत. पहिल्यांदाच सर्व राज्य मंत्र्यांना या बैठकीला बोलावण्यात आले.
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. बच्चू कडूंसह 10 आमदार मुंबईत येणार. आमदारांचा हा गट सरकार अल्पमतात असल्याचं पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना देणार. 48 तासात बहुमत सिद्ध करण्याची मागणी करणार
बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा वरुन पाहतोय. शिवसेना, ठाकरे परिवाराला क्लेश देणाऱ्यांना त्याची किंमत मोजावी लागेल. सुखाने झोप येणार नाही. 50 कोटी पण तुम्हाला टोचतील. शिवसेनेचं नाव सोडून निवडून येऊन दाखवा. जिथे ठाकरे तिथेच शिवसेना. शिवसेने मुळे आम्ही खासदार झालो आमदार झालो. शिवसेना सोडून जाणाऱ्यांनी स्वत: कबर खोदलेली आहे. तुम्ही राजकीय कबर खोदली आहे. जनता यावर माती टाकेल
नारायण राणे, गणेश नाईक, छगन भुजबळ जे कोण शिवसेना सोडून गेले ते गुलामच झाले ना. शिवसेना सोडणाऱ्या कुणाचेही भल झाल नाही. तीच अवस्था या 40 लोकांची होणार आहे. तुमच्यात मुंबईत यायची हिंमत नाही.
तुम्ही त्या 5 स्टार हॉटेल मध्ये कैदी बनून राहिले आहात; तुम्हाला गुलाम केलेय – संजय राऊत
22 वर्ष दिघे साहेबांचे विचार आठवले नाहीत का?
ईडी पासून सुटका करुन घेण्यासाठी हे सर्व कट कारस्थान
आम्हाला हिंदूत्व कुणी शिकू नये
भर सायंकाळी उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला. एका क्षणात निर्णय घेतला.
उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा सगळ्या महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आले.
बहुमत आहे ना? मग लपून का बसला आहात? एकनाथ शिंदे गटाला संजय राऊतांचा सवाल
हिंदूत्वाशी संबध नसलेलेलेही हे बंडखोरांसोबत पळून गेलेत
बाळासाहेब आणि ठाकरे कुटुंबियांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचे वाटोळं झालयं असा इतिहास सांगतो
माझ्या वाटेत ED बसले आहेत. माझ्या वाटेत कितीही आडवे आले तरी मी गुवाहाटीला जाणार नाही. मला अटक करा मी घाबरत नाही.
महाराष्ट्रात शिवसेना संपवण्याचे काम सुरु आहे. 56 वर्षे शिवसेना सुरु आहे.
सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. कोणत्याही क्षणी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले असून त्यांनी जेठमलानी आणि जे पी नड्डा यांची भेट घेतली. फडणवीस अमित शहांशी देखील चर्चा करणार असल्याचे समजते. आषाढ अमावस्येनंतर सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला जाणार आहे. बुधवारी सकाळी ८.४१ नंतरचा मुहुर्त असेल अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
महाविकास आघाडी सरकारची शेवटची कॅबिनेट बैठक होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे बैठकीसाठी मंत्रालयात येणार आहे. उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस पक्षश्रेष्ठीं सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली आहे. मंत्र्यांनी वैयक्तिक कागदपत्रे घरी नेण्याची तयारी सुरु केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर सरकार बरखास्त होण्याची शक्यता आहे.
काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल असं म्हणत एकनाथ शिंदे सेलिब्रेशन मोडमध्ये दिसले. एकनाथ शिंदे यांच्या गटात आनंदाचं वातावरण आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत. भाजपने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. राजकीय घडामोजींना वेग आला असतानाच एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर शिंदे गटाची बैठक पार पडली. आवाहनानंतर शिंदे गटाच्या भूमिकेकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
भजापचा सत्तेस्थापनेचा फॉर्मु्युला तयार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग असून दिल्लीत याबाबत हालचाली सुरु आहेत. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झाले आहेत. जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी भाजपची अत्यंत महत्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीत अमित शाहांशीही चर्चा होणार असल्याचे समजते. 29 भाजपाचे आमदार मंत्री, 13 मंत्री – 8 कॅबिनेट-5 राज्यमंत्री – शिंदे गटाला मिळू शकतात असा हा फॉर्म्युला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांच्याशी फोनवरुन चर्चा. शरद पवार हे देखील सातत्याने उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत.
सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली सुरु झाल्यात. देवेंद्र फडणवीस हे तातडीने दिल्लीत दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस हे जे. पी. नड्डांच्या भेटीला गेले आहेत. जे. पी. नड्डा यांच्या निवससस्थानी ही बैठक सुरु आहे.
येत्या काही वेळात राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. सायंकाळी 5 वाजता महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री राजीनामा देण्याची शक्यता आहे. यामुळे ही महाविकास आघाडी सरकारची शेवटची कॅबिनेट बैठक ठरु शकते.
शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे सत्ता संघर्षावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धवजींबद्दल अभिमान वाटतो. या सर्व परिस्थितीत माँ आणि बाळासाहेबांची आठवण येते.
घरातील मोठा भाऊ कसा असावा तर तो उद्धव ठाकरेंसारखा असावा. बाळासाहेबांनी अनेकांवर प्रेम केलं त्यात मी पण आहे. ते स्वत: हायात असताना, उद्धवजींना उत्तराधिकारी म्हणून जबाबदारी दिली. जर उद्धवजी प्रेमाने काही आवाहन करत असतील, तर ते खरं आहे. राजकारण सुरु राहिल पण माणसं आणि नेत्यांचे एकमेकांशी असलेले संबध टिकून राहतात.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शरद पवारांसह चर्चा करणार आहेत. महविकास आघाडीची सायंकाली 5 वाजता कॅबिनेट बैठक आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यास त्यांची ही शेवटची बैठक ठरू शकते.
आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात . आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे , आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात . आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत , आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो , कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही , माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे , आपण या माझ्या समोर बसा , शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा , यातून निश्चित मार्ग निघेल , आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू . कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका , शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही , समोर आलात बोललात तर मार्ग निघेल . शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे . समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.
काही लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी आनंद दिघे साहेबांच्या नावाचा वापर केला. त्यांनी आनंद दिघे साहेबांचे पाय धुतांना एक तरी फोटो मला दाखवा. सिनेमा बघून शिवसैनिकांना वाटलं की कर्मवीरांचे हे कर्मवीर आहे. परंतु हे डुब्लीकेट निघाले असा घणाघाती आरोप संजय सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला. जळगावच्या धरणगावात संपर्क अभियान दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलं.
सध्या राज्यात जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याविरोधात राज्यातील काही सामाजिक कार्यकर्ते, आणि लेखक यांच्याकडून बंडखोर आमदार आणि मंत्र्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती असीम सरोदे यांनी दिली आहे. सध्या सगळे राजकीय पक्ष आपली मते मांडत आहेत. पण यात सामान्य नागरिकांचा नेमकं काय मत आहे. याचा विचार कुठलाही राजकीय पक्ष करत नाही. या लोकशाहीमध्ये नागरिकांचा देखील काहीतरी अधिकार आहे. यावर कुणीच काही बोलत नाही आणि म्हणून ही जनहित याचिका दाखल करण्यात आल्याचं सरोदे यांनी सांगितल आहे. आपलं कुठलेही राजकीय भान न ठेवता सगळे आमदार आणि मंत्री राज्य सोडून निघून गेले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे देखील आम्ही याचिकेत नमूद केलं असल्याचं असीम सरोदे यांनी स्पष्ट केल आहे.
आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्याचा कारभार थांबवता येत नाही. महाराष्ट्रातील कोट्यावधी जनतेला न्याय देण्यासाठी आम्ही मंत्री झालो आहे. काही आमदार सहलीला गेलेत आणि ते तिकडे रमले आहेत. झाडी, डोंगर, बघतायेत सगळे.. एवढ्या कोटीचा जनतेचा कारभार आहे तो कसा थांबवायचा. महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आहे आणि आमचं काम चालू आहे. अविश्वास प्रस्ताव आणला तर काय ? प्रश्न विचारताचं ही कायदेशीर बाब आहे असं जयंत पाटील म्हणाले. आमचं सरकार आहे आणि चिंता करण्याचं कारण नाही. कायदा आहे आणि न्यायव्यवस्था आहे. सभागृहात आमच्या सरकारविषयी कोणी नाराजी व्यक्त केलेली नाही. अशी प्रतिक्रिया जयंत पाटल यांनी दिली आहे.
मुंबई- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. स्वतः मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिल्याचे माहिती मिळाली आहे. बाळासाहेबांचे नाव मी दिले नाही. दि बा पाटील यांच्या नावाला माझा कुठलाही विरोध नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व नेत्यांसमोर दिली माहिती. जे नाव एकनाथ यांनी दिले त्याला माझा विरोध नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या विमानतळावर दाखल झाले आहेत. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील राजकारणावरती महत्त्वाची बैठक होणार आहे.
कॅबिनेट बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. संध्याकाळी कॅबिनेट बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. दुपारी अडीच वाजता बैठक होणार होती.
-सोमवारी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक आकुर्डीत पार पडली, शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केले, त्यानंतर आज शहरात काही ठिकानी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात फ्लेक्स लागलेले दिसतायत
दीपक केसरकर आमचे प्रवक्ते, ते वेळोवेळी माहिती देणार, प्रवक्यांच्या माध्यमातून तुम्हाला माहीत मिळेल, सगळे लोक अगदी आनंदात आहे, जी बाहेरुन सांगत आहेत की एवढे संपर्कात, तेवढे संपर्कात सांगत आहेत, त्यांनी नावं सांगावी, आम्ही खुलासे करु, इथे पन्नास लोक आहेत… इथे स्वतःच्या स्वार्थासाठी कुणीही आलेलं नाही. बाळासाहेबांची आणि हिदुत्वासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. पुढील माहिती केसरकर देतील.. पुढची दिशा लवकरच स्पष्ट करु.
नाशकात शिंदे समर्थकांच्या आंदोलनाला पोलिसांनी नाकारली परवानगी आहे. शिवसेना वैद्यकीय आघाडी शिंदेंच्या पाठीशी आहे. मविआ सरकारच्या विरोधात आज आंदोलन करणार होते. शिंदे समर्थकांच्या घरावर झालेल्या तोडफोडीचा निषेध करणार होते. जमावबंदी लागू असल्याचं पोलिसांनी कारण दिलंय. सेनेने विरोध केला तरी शिंदेंच्या सोबत असण्यावर समर्थक ठाम आहेत.
मी आजही शिवसेनेतच असल्याचे आमदार उदय सामंत यांचं स्पष्टीकरण
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान सहयोगी पक्षाकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या निवडणुकीत देखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून काँग्रेस – राष्ट्रवादी या घटकपक्षांनी प्रयत्न केले.
त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथजी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
असं असलं तरीही आजही मी शिवसेनेतच असून त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी कोकणातील जनतेने कोणताही गैरसमज करून घेऊ नये.
जी काय वस्तूस्थिती ती आम्ही समोर आणू. आम्ही शिवसेनेच्या हितासाठी बाहेर पडलो आहे. विश्वासदर्शक ठराव तर आणा. महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय जाहीर करा, आम्ही आजही यायला तयार…मला जर उद्या कुणी गद्दार म्हणालं तर आम्ही त्याला उद्या जाबं विचारणार…संजय राठोडांसाठी दादा भुसे यांनी लढा दिला आहे. पैशाने सुध्दा काही गोष्टी सुटत नाही. आत्ता मी शांत शब्दात बोलत आहे.
आदित्य ठाकरेंनी आपली भाषा सुधारावी. कारण त्यांच्याकडे आम्ही एक नेतृत्व म्हणून पाहतोय. त्यांनी संजय राऊत यांच्यासारखी भाषा करू नये. आम्ही युतीचे आमदार आहोत, त्यामुळे संजय राऊत यांनी विचार करून बोलायलं हवं.
फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने मला काहीचं प्रॉब्लेम नाही. परंतु ते आमच्या साहेबांच्या अर्शिवादाने मुख्यमंत्री व्हावे अशी आमची इच्छा…त्यांनी एकदा आम्ही काय म्हणतोय त्यावर आज मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. संभाजीनगरच्या नावाला कॉंग्रेस राष्ट्रवादी यांनी विरोध केला
एकनाथ शिंदे आज दिल्लीत दाखल होण्याची शक्यता,
फडणवीस दिल्लीकडे रवाना
हे सगळे बंडखोर गुवाहाटीत बसून कारस्थान करतायत त्यांनी आधी महाराष्ट्रात यावे आणि मग बोलावे तिथे आमदारांना डांबून ठेऊन हे सरकार स्थापनेचा विचार करत आहेत. एकनाथ शिंदे हे कसल्या मुक्तीची भाषा करत आहेत. शिवसेना हा शिवसैनिकांचा आत्मा आहे, आणि आमचा आत्मा आमच्यापासून कुणीही वेगळा करू शकणार नाही. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांची अजूनही सेनेसोबत यायची इच्छा आहे. एकनाथ शिंदे हा विषय आमच्यासाठी संपला आहे, आता शिवसेनेत एक व्यक्ती जरी उरला तरी आम्ही एकाचे लाख करू इतकी ताकत आमच्यात आहे असं अर्जुन खोतकर यांनी सांगितलं.
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) June 28, 2022
देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याची माहिती, अमित शहांची भेट घेण्याची शक्यता
सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता. अशा बातम्या प्रकाशित होत आहेत ह्या निव्वळ भूलथापा आहेत. उद्धव साहेब ठाकरे जे बोलायचे ते खुलेआम बोलतात. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये असं शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी सांगितलं.
शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी माथेरानचे नगरसेवक प्रसाद सावंत यांची नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात जाऊन घेतली भेटशिवसेनेचे नगरसेवक प्रसाद सावंत यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी संजय राऊत एमजीएम रुग्णालय कळंबोली येथे गेले होते.
सरकार काही पैसे कमावण्याचे उद्योग करीत असल्याची शंका आल्याने राज्यपालांना पत्र देण्यात आले. त्यांच्यावर भाष्य करण्याची वेळ अद्याप आलेली नाही. काय भाष्य करतील याचा काही नेम नाही. जेवढे दिवस आवश्यकता आहे. तेवढे दिवस शांत राहणार. महाराष्ट्रातल्या जनतेचा अनादार केला. त्यामुळे आम्ही निश्चित वेट आणि वॉचच्या भूमिकेत आहे. त्यांच्याकडे बहुमत नसेल तर त्यांनी तो जनहिताचा निर्णय घ्या. समानाबाबत फार भाष्य करणं त्यांचं वितरण वाढवण्याचा काम आहे. परिस्थिती पाहुन आम्ही त्यावर विचार करू. आम्ही ते पाहत आहोत, त्यामुळे थांबून आम्ही त्यावर निर्णय घेऊ…
मोठी बातमी! उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 21 जूनला फोनवर चर्चा झाली होती. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. मागच्या आठदिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे नेमकी चर्चा काय झाली असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाची अस्मिता टिकवण्यासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या दोन्ही लेकरांनी एकत्र यावं ही माझी इच्छा आहे असं विधान मनसेच्या माजी नगरसेविका आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी केलं आहे. राज्यात सध्या जी परिस्थिती आहे ती नेमकी कुणामुळे आहे. त्यात नेमका कुणाचा दबाव आहे. कोण सत्तेसाठी काय करत आहे. हे आता वारंवार सांगण्याची गरज नाही असं सांगत रूपाली ठोंबरे यांनी नाव न घेता भाजपावर देखील टीका केली. ज्यावेळी भगवान रामांना वनवासात जायची वेळ आली होती त्यावेळेस त्यांचा भाऊ लक्ष्मण सगळ सोडून त्यांच्यासोबत गेले होते.आता देखील राम लक्ष्मणाची जोडी हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी एकत्र येणे गरजेचं आहे असं सांगत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावी अशी इच्छा देखील रुपाली ठोंबरे यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री तुम्ही आहात म्हणून सेन्सॉरशिप लावणार का ? धर्मवीर या चित्रपटाच्या या सीनवरूनच एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये दुरावा निर्माण झाला असावा असं अमेय खोपकरांच यांनी वक्तव्य केलं. या शिवसेनेच्या घाणेरड्या मनोवृत्तीचा निषेध करावा तेवढा कमी आहे. मात्र राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जातायेत. मुख्यमंत्र्यांना राज ठाकरेंच कौतुक आवडलं नसावं म्हणून त्यांनी लवकर चित्रपटगृह सोडलं असावं. बंडखोर आमदारांनी जी भूमिका घेतलेली ती वैयक्तिक मते योग्य आहे. येणाऱ्या पुढच्या निवडणुकीत मनसे हा सगळ्यात मोठा पक्ष आहे. राज ठाकरे आता घरी आहेत त्यांना आरामाचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात शिंदे समर्थक विरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष शिगेला पेटलाय. त्यातच अनेक ठिकाणी आंदोलन करत व बॅनरबाजी करत आपल्या नेत्यांना समर्थन देत असल्याचे दिसून येत आहे. अशाच प्रकारे डोंबिवली मधल्या युवासेनेच्या शहर युवा अधिकारी सागर जेधे यांनी देखील बॅनर बजी करत एकनाथ शिंदे यांना आपले समर्थन दिले. त्याच प्रमाणे एकनाथ शिंदे यांना यांच्या समर्थनाची पोस्ट सोशल साईट वरती वायरल केली. तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे याच्या कार्यकर्ता मेळावा व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थित न राहिल्याने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेना नेते , युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह 16 बंडखोर आमदारांना पाठवलेल्या अपात्रतेच्या नोटिसांना आणि गटनेतेपदाच्या नियुक्तीला एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सोमवारी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर शिंदे गटाला काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शिंदे समर्थकांनी डोंबिवली व कल्याण ग्रामीण परिसरात नारेबाजी करत फटाके फोडून जल्लोष केला.
‘धर्मवीर’ आनंद दिघे यांचा आवाज दाबणाऱ्या वृत्तीचा कडक शब्दात निषेध. pic.twitter.com/STYsekKnXg
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) June 28, 2022
सद्या शिवसेनेतील काही आमदारांनी बंड पुकारल्याने सत्तेसाठी रस्सीखेच सुरू आहे. यात मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला सारले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. वन्य प्राण्यांचा संचार समृध्दी महामार्गावर होऊ नये, याकरिता 15 फूट उंच भिंत रस्त्याच्या दुतर्फा बांधण्यात आली आहे. मात्र हीच भिंत शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आणते आहे. या भिंतीमुळे शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या थांबल्यात.
सांगली – शिवसेनेवरील संकट दूर व्हावे यासाठी सांगलीच्या शिवसैनिकांकडून किल्ले प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरापर्यंत लोटांगण घालण्यात आले. शिवसेनेचे सांगली शहर प्रमुख मयूर घोडके यांच्यासोबत शिवसैनिकांनी हे लोटांगण लातले. शिवसेनेवरील संकट दूर करीत हिंदुत्वामध्ये पडणारी फूट थांबवण्याचे साकडे घालण्यात आले. सांगलीतून गेलेल्या शिवसैनिकांनी प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते गडावरील तुळजा भवानी देवीच्या मंदिरापर्यंत लोटांगण घालीत आई तुळजा भवानीला शिवसेनेवरील संकट दूर करण्याबाबतचे साकडे घातले. यामध्ये सांगलीतील अनेक शिवसैनिकही सहभागी झाले आहेत.
आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीची मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. दुपारी अडीच वाजता होणार मंत्रिमंडळाची बैठक असल्याची माहिती मिळाली आहे. ठाकरे सरकारची ही शेवटची कॅबिनेट ठरणार का याकडे लक्ष सगळ्यांचे लक्ष लागले आहे. बंडखोरीच्या पार्श्वभूमीवरती आज कॅबिनेट बैठक आहे.
ते जोपर्यंत ते महाराष्ट्रात येत नाहीत. तोपर्यंत आम्ही आशावादी आहे. अनेक ठिकाणी लोकांचा जनसागर पाहायला मिळाला आहे. आमचं सुध्दा वेट आणि वॉच करीत आहोत. लवकरचं ठाण्यात सुद्धा अशी परिस्थिती पाहायला मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सध्या जे काय डबकं झालंय. त्यात उतरू नये. डबक्यात बेडूक राहतात, त्यामुळे त्यांनी शांत रहावं. त्यामुळे पक्षासह त्यांनी मोठी प्रतिष्ठा घसरली जाईल.
आज संजय राऊतांना ईडी चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. परंतु मी आत्ताचं ईडीच्या चौकशीला हजर राहणार नाही असं संजय राऊत यांनी सांगितलं. त्याचबरोबर याच्यानंतर इतर राज्यात देखील अशीचं परिस्थिती पाहायला मिळणार आहे. आमच्यावरती कितीही अन्याय केला तरी आम्ही त्यांना झुकणार नाही.
कुर्ल्यात दुर्घटनेत सरकारी मदतीआधी शिंदेची मदत!
कुर्ल्यात इमारत कोसळली
एकनाथ शिंदे आणि मंगेश कुडाळकर यांच्याकडून दुर्घटनाग्रस्तांना मदतीचा हात
आर्थिक मदतीच्या थेट गुवाहाटीतून सूचना
मृताच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत
जखमींना 1 लाखांची मदत
रत्नागिरी- : शिवसेना आमदार भास्कर जाधव चिपळुणात परतले
गेल्या दोन दिवसांपासून भास्कर जाधव यांचा मुंबईत मुक्काम होता
चिपळूण भास्कर जाधव आज कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार
पुढील दोन दिवस भास्कर जाधव यांचा मुक्काम चिपळूणमध्येच असणार
दोन-तीन दिवसात भाजपचं सरकार येणार अन् देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार
भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना विश्वास
आषाढी एकादशीला विठ्ठल-रुक्मिणी महापूजा फडणवीसच करतील
शिवसेनेचे 10 ते 12 खासदार एकनाथ शिंदेसोबत येतील
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्या केसालाही धक्का लागणार नाही
येत्या दोन तीन दिवसात राज्यात भाजपचे सरकार सत्तेत येईल. तसेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील.आषाढी एकादशीची श्री विठ्ठल रुक्मिणी महापूजा फडणवीस करतील. शिवसेनेचे 10 ते 12 खासदार एकनाथ शिंदे सोबत येतील. एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या आमदारांच्या केसालाही धक्का लागणार नाही असं भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितलं
एकनाथ शिंदे व इतर मंत्र्यांना त्वरित त्यांचे ऑफिस जॉईन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने द्यावेत अशी मागणी करणारी जनहित याचिका महाराष्ट्रातील 7 सजग नागरिकांनी ॲड. असीम सरोदे यांच्या मदतीने उच्च न्यायालयात दाखल केली
जामनेर येथे युवा सेनेच्या 51 कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताने पत्र लिहून व रक्ताने अंगठ्याचे ठसे उलटून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांना समर्थन दिले आहे. गद्दारांनी पक्ष संकटात आणला आहे मात्र कार्यकर्त्यांच्या नसानसात रक्ताच्या प्रत्येक थेंबात शिवसेनाप्रमुखांचे ज्वलंत विचार आहेत त्यामुळे युवा सेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी सदैव आपल्या सोबत असून ही खिंड लढवली यासाठी आम्ही सज्ज आहोत, तोफेचे बार ऐकल्याशिवाय एकही कार्यकर्ता हा मागे हटणार असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
रत्नागिरी- शिवसेना आमदार भास्कर जाधव चिपळुणात परतले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून भास्कर जाधव यांचा मुंबईत मुक्काम होता. चिपळूणमध्ये भास्कर जाधव आज घेणार कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, पुढील दोन दिवस भास्कर जाधव यांचा मुक्काम चिपळूण मध्येच राहणार असल्याची माहिती मिळाली आहे.
आज
मुक्काम पोस्ट अलिबाग
एल्गार;एल्गार!! pic.twitter.com/GX5n8A8txi— Sanjay Raut (@rautsanjay61) June 28, 2022
राज्यपाल कोश्यारींचं मुख्यसचिवांना पत्र,
3 दिवसात मंजूर केलेल्या जीआरची माहिती मागितली
आमच्याशी चर्चा करुन काय होणार आहे? आमचे जे मित्र पक्ष आहेत, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. आम्ही का दुखावलो गेलो, यावर त्यांनी चर्चा करावी. त्यांनी चर्चा करावी. चर्चा त्यांची जेव्हा होईल, त्यात सकारात्मक काही निघालं की पुढे शिंदेसाहेबांना सांगितलं की ते शिंदेसाहेब स्वतःहून पुढे येतील. शिंदेसाहेबांच्या मनात कुठेही असं नाहीये की उद्धव ठाकरेंना दुखवावं, शिवसेनेतून बाहेर पडावं असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.
आम्हाला थोडासा वेळ मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. ठाकरेंनी योग्य निर्णय घ्यावा, कारण आमच्या प्रेमापोटी आम्ही त्यांना पत्र देत आहोत. त्यांनी मित्र पक्षांशी चर्चा करावी, कारण ते कुठे दुखावले आहेत. हे सुद्धा तपासून पाहावे लागेल.
करमाळा तालुक्यातील शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी शिवसेना बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात शिवसेनाला मोठा झटका बसला आहे. 2014 मध्ये नारायण पाटील शिवसेनेकडून निवडून आले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेना उमेदवार रश्मी बागल यांच्या विरोधात बंडखोरी करत निवडणुक लढविली होती.परंतू त्यांचा निसटत्या मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर ते शिवसेनेवर नाराज होते. शिवसेना आमदारांच्या बंडा नंतर नारायण पाटील यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.
कोल्हापूरात बंडखोर आमदारांच्या प्रतिमेला काळ फासलं, शिवसैनिक आक्रमक
शिवसेनेचा बंडखोर आमदारांविरोधात राज्यभरात शिवसैनिकांनी मधून समता पाहायला मिळतोय.कोल्हापुरातील आर के नगर चौकीत शिवसैनिकांनी बंडखोर आमदार एकनाथ शिंदे, प्रकाश आबिटकर,माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रतिमेला काळ फासून त्यांचा निषेध केला. तालुकाप्रमुख विराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आल. यावेळी शिवसैनिकांनी बंडखोर आमदार तसेच भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बंडखोर आमदार आणि आता निवडून येण्याचा स्वप्नही पाहू नये असा इशाराच यावेळी या शिवसैनिकांनी दिलाय.
मातोश्रीच्या जाचाला किंवा राजकारणाला कंटाळून बंडखोरी केली असे कारण सांगणारे माननीय राजसाहेब आता ११ वरून १ वर आले आहेत आदरणीय शिंदे साहेब शिवसेनेचे राजकिय गणित नेहमी अधिक असते वजा नाही त्यामुळे राजकिय सल्ले घेताना हिशेब बघुन घ्या. मनचे हा पक्ष नसुन डिपॅाझिट जप्तची मशिन आहे.
— Deepali Sayed (@deepalisayed) June 27, 2022
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 28, 2022
सोनिया गांधी यांच्या स्वीय सहाय्यकावर गुन्हा दाखल झाला आहे. स्वीय सहाय्यक पीपी माधवन याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी दिल्लीतल्या उत्तम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. नोकरी आणि लग्नाच आमिष दाखवून महिलेची फसवणूक आणि अत्याचार, असा आरोप माधवन यांच्यावर करण्यात आला आहे. पीडित महिलेचा पती काँग्रेस कार्यालयात कर्मचारी होता. पतीच्या निधनानंतर पीडित महिलेला माधवनने आमिष दाखवून अत्याचार केले आहेत. माधवन यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळले असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
बंडखोर आमदारांची नवीन भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बंडखोर आमदार पत्र पाठवण्याची शक्यता आहे. अविश्वास ठराव काढून घेतल्याच्या पत्रापूर्वी मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा पत्र पाठवले जाणार आहे. भाजप सोबत युती करण्याची विनंती बंडखोर आमदार उद्धव ठाकरे यांना करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. सध्या बंडखोर आमदारांचा मुक्काम गुवाहाटीमध्येच
आहे.
महाराष्ट्रात निमलष्करी दल पाचारण केले जाणार आहे. राज्यपालांची विनंती केंद्र सरकार मान्य करणार सूत्रांनी माहिती दिली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालय सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे. बंडखोर आमदार महाराष्ट्रात परतण्यापूर्वी निमलष्करी दलाला पाचारण केले जाणार आहे. कायदा सुव्यवस्था बाबत परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी राज्यपालांचे केंद्रीय गृह सचिवांना पत्र दिलं आहे.
राज्यपालांच्या पत्राला केंद्र सरकार सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या तयारीत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिर्डी येथे शिवसैनिकांनी भव्य मोर्चा काढला. या मोर्चात भगवा ध्वज घेऊन मुस्लिम शिवसैनिक देखील सहभागी झाले होते. ‘त्यांनी एक अब्दुल सत्तार नेला मात्र आम्ही हजारो मुस्लिम मावळे उद्धव ठाकरेंच्या सोबत असून आम्ही मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार ‘ अशी भावनिक प्रतिक्रिया अजीज मोमीन या मुस्लिम शिवसैनिकाने व्यक्त केली.
बात स्वाभिमानाची आणि हिंदुत्वाची करायची आणि है असले भलतेच उद्योग करून महाराष्ट्रद्रोह्यांचे हात बळकट
करायचे. “महाराष्ट्राचे तुकड़े करणाऱ्यांचे तुकड़े करू, ” असे शिवसेनेपैकी कोणी बोलले तर यांच्यापासून आमच्या
जीवितास धोका आहे हो स S S ,” म्हणून बोभाटा करायचा. बेळगावातील मराठी अत्याचारांवरही आता यांची तोड़े बंद
पड़तील. शिवसेनेने या सर्व विषयांवर फक्त प्रखर भूमिका घेतल्या नाहीत, तर रस्त्यावरचे लढ़े दिले. भारतीय जनता
पक्षाशी जे पाट लावू इच्छित अहेत त्यांनी आपला महाराष्ट्र बाणा एकदा तपासून पाहावाच. दानवे म्हणतात
त्याप्रमाणे राज्यात पुढील दोन दिवसांत त्यांचे सरकार येईल, बंडखोरांचे नाही. त्यासाठी ते उतावीळ आहेत, पण
महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय?
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळी नंतर राज्यात शिंदे समर्थक विरुद्ध उद्धव ठाकरे असा संघर्ष शिगेला पेटलाय . त्यातच डोंबिवलीतील शहर शाखेत असलेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयातील एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो काढल्याचे दिसून आले . शिंदे पिता पुत्राचे फोटो काढल्याचे कळताच शिंदे समर्थक शाखेत आले असता शिवसेना पदाधिकारी व त्यांच्यात वाद झाले . शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यानी फोटो काढून खासदार कार्यालयातील कर्मचाऱ्याना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली .मात्र शिवसेना पदाधिकारी ,शिंदे समर्थकांनी याबाबत असे काही झाले नाही अस सांगत काहीही बोलण्यास नकार दिला .शिवसेना पदाधिकारी ,शिंदे समर्थक ,पोलिसांनी देखील या प्रकरणी चुप्पी साधली असली तरी शाखेतील खासदार कार्यालयातून शिंदे पिता पुत्राचे फोटो कुणी काढले असा सवाल करत शाखेत झालेल्या या वादाची चर्चा शहरात रंगली आहे .
महाविकास आघाडीचा पाठींबा काढण्याचं पत्र शिंदे गट आज राज्यपालांना देणार
योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ – सुधीर मुनगुंटीवार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर रात्री शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. जवळपास तासभर ही बैठक चालली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी सरकार स्थिर असल्याचा दावा केलाय.
गुवाहाटी – बंडखोर आमदारांचा मुक्काम वाढला. हॉटेल रेडिसन ब्लू अनिश्चित काळासाठी बुक. शिंदे गटाकडून हॉटेलचं बुकिंग पुन्हा वाढवलं सूत्रांची माहिती. 12 जुलै पर्यंत आमदारांचा मुक्काम गुवाहाटीमध्येच ? 30 जूनपर्यंत होत हॉटेलचे बुकिंग, पण आता अनिश्चित काळासाठी हॉटेलचे बुकिंग करण्यात आल्याची सूत्रांची माहिती.