Video : एकनाथ शिंदे गांगरले अन् देवेंद्र फडणवीसांनी सावरले, नेमका किस्सा तरी काय?

ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगू का...सांगू का...म्हणत बंडानंतरचे अनेक किस्से सभागृहात मांडले. त्यामुळे मितभाषी आणि संयमी शिंदे नेमके आहेत तरी कसे याचा प्रत्यय राज्याला आला आहे. बंडाच्या दरम्यान ते आणि देवेंद्र फडणवीस केव्हा भेटत होते याबाबत सांगताना एकनाथ शिंदे म्हणाले की, सगळे कर्ता करविता फडणवीसच आहेत...दरम्यानच्या काळात आमच्या बैठका झाल्या पण याचा सुगावा बंडखोर आमदारांना देखील लागला नाही.

Video : एकनाथ शिंदे गांगरले अन् देवेंद्र फडणवीसांनी सावरले, नेमका किस्सा तरी काय?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Jul 05, 2022 | 2:37 PM

मुंबई :  (Eknath Shinde) एकनाथ शिंदे हे किती दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत याचा प्रत्यय विधासभेत बहुमत सिध्द झाल्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणा दरम्यान सबंध राज्याच्या लक्षात आले आहे. शिवाय भावनेच्या भरात ते एका मागून एक किस्से सांगत होते तर (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना आवरण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले की, (Santosh Bangar) संतोष बांगर कोणत्या पक्षातून तुमच्याकडे आले ? त्यावेळी देखील ते अगदी सहजरित्या कोणत्या म्हणजे शिवसेनेच्या असे म्हणणार तेवढ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या समोरचा माईक काढून घेतला आणि सांगितले की ते त्या शिवसेनेतून खऱ्या शिवसेनेत आले आहेत, आतापर्यंत ते चुकीच्या गटात होते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे जरी मुख्यमंत्री पदावर असले तरी सरकारमध्ये वर्चस्व कुणाचे हे आता नव्याने सांगायची आवश्यकता नाही. त्यामुळे विकास कामात तर मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांची साथ तर असणारच आहे पण अशा कठीण प्रसंगी देखील त्यांच्याशिवाय पर्याय नाही हेच यामधून समोर येत आहे.

एकनाथ शिंदेंनीही दिली दाद

पत्रकाराचा फिरकी प्रश्न एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आला नसला ती देवेंद्र फडणवीस यांनी त्याला उत्तर दिले. देवेंद्र फडवणीस यांच्या उत्तरानंतर एकनाथ शिंदे यांना प्रश्न समजलाही आणि उमजलाही. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनीदेखील भूवया उंचावून पत्रकाराच्या प्रश्नाची दाद दिली.

अन् फडणवीसांनी डोक्यालाच हात लावला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगू का…सांगू का…म्हणत बंडानंतरचे अनेक किस्से सभागृहात मांडले. त्यामुळे मितभाषी आणि संयमी शिंदे नेमके आहेत तरी कसे याचा प्रत्यय राज्याला आला आहे. बंडाच्या दरम्यान ते आणि देवेंद्र फडणवीस केव्हा भेटत होते याबाबत सांगताना एकनाथ शिंदे म्हणाले की, सगळे कर्ता करविता फडणवीसच आहेत…दरम्यानच्या काळात आमच्या बैठका झाल्या पण याचा सुगावा बंडखोर आमदारांना देखील लागला नाही. हे झोपलेले असताना मी भेटायला निघून जायचो आणि आमदार उठायच्या आतमध्ये मी परत यायचो. एकनाथ शिंदे यांना आवर घालत बास झालं…नाहीतर संगळच सांगताल असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी चक्क डोक्यालाच हात लावला.

हे सुद्धा वाचा

कर्ता- करविता हेच, एकनाथ शिंदेंचे फडणवीसांकडे बोट

दरम्यानच्या काळात जे झाले ते यांच्यामुळेच म्हणत एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट केले. राज्याचा कारभार चालविण्यासाठी त्यांच्या अनुभावाचा फायदा होणार आहे. असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषद निवडणुकीनंतर मुंबई ते सुरतचा प्रवास कसा झाला हे देखील सांगितले. शिवाय अंतिम टप्प्यात काय होणार याची कल्पना केवळ देवेंद्र फडणवीस यांनाच होती. त्यामुळे ते खुश होते पण आमच्या आमदारांचा जीव टांगणीला लागल्याचे शिंदे म्हणाले. मात्र, पत्रकार परिषदेत त्यांनी केवळ एकजण आज शपथ घेणार आणि ते म्हणजे एकनाथ शिंदे असे सांगितले. त्यामुळे सत्तेसाठी भाजप पक्ष कोणत्याही स्तराला जातो हे मोडीत काढले असल्याचेही शिंदे म्हणाले.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.