मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) आणि शिवसेनेबाबत खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. यानंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे(Chandrakat Khaire) यांनीही एक गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली आहे.
2014 मध्ये राज्यात युतीचे सरकार होते. असे असताना सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेकडून काँग्रेसकडे प्रस्ताव आला होता. सत्ता स्थापनेबाबातच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदेही होते. प्रस्तावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याबाबत सुचवलं होतं असेही चव्हाण म्हणाले.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी याला दुजोरा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दहा ते पंधरा आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते असा गौप्यस्फोट खैरे यांनी केला आहे.
आमदार संजय शिरसाट यांनीच मला याबद्दल सांगितले होते असेही खैरे म्हणाले. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हे हिंदुत्ववादी विचाराचे नसून हे सत्तापीपासून विचारांचे आहेत. जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत घेण्याचा त्यांना पटत नव्हतं तर त्यांनी अडीच वर्षे सत्ता का भोगली ? असा सवालही चंद्रकांत खैरे यांनी उपस्थित केला आहे.