मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आजच राज्याचे नवे मुख्यमंत्री (New Cm Of Maharashtra) म्हणून शपथ घेतली आहे. तर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या नव्या सरकारची पहिली बैठकही (Cabinet Meeting) पार पडली आहे. त्यानंतर काही वेळातच त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला आहे. आपण नवीन सुरुवात करत आहोत. आपल्यासोबत अनुभवी उपमुख्यमंत्री आहेत, असे म्हणत त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांचेही कौतुक केले आहे. त्यामुळे कारभार करण्यास अडचण येणार नाही राज्यातील विकास कामे विविध प्रकल्प आणि समाज घटकाला न्याय देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून काम करावे लागते, असेही शिंदे यावेळी म्हणाले आहेत. त्यामुळे राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेचीही सध्या चांगलीच चर्चा आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र यावेळी अत्यंत संक्षिप्त प्रतिक्रिया दिली आहे.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही एका रथाची दोन चाके आहेत. लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. तो सार्थ ठरवायाचा आहे. आपल्या कामातून गती किमान शासन प्रशासन आहे, असा कानमंत्र त्यांनी यावेळी दिला आहे. हा संदेश जाणे तसेच मेट्रो समृद्धी महामार्ग जलसंपदा विभागांचे महत्त्वाचे प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावयाचे आहेत, त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य मिळेलच, हा विश्वास असल्याचेही शिंदे यावेळी म्हणाले आहे.
माजी मुख्यमंत्री यांनीही या नव्या सरकारला ट्विट करत आपल्या शुभेच्छा असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!, असे ट्विट उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री @mieknathshinde जी व उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) June 30, 2022
यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “आपल्या सोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे. गतिशीलता देणे आणि निर्णय क्षमता येणे महाराष्ट्र पुढे नेण्याचा प्रयत्न करूया”, अशी प्रतिक्रिया यांनीही दिली आहे. तर आजच्या बैठकीत मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील खरीप हंगाम पीक पाणी पीक विमा तसेच कोबी बाबतची परिस्थिती याबाबत सादरीकरण करण्यात आले, अशीही माहिती यावेळी देण्यात आली आहे. सर्व क्षेत्राला न्याय देण्याासाठी आमचं सरकार हे कटीबद्ध आहे, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे.