Eknath Shinde : मुंबईला कधी परत येणार? पत्रकारांच्या प्रश्नाला एकनाथ शिंदेंकडून हसत हसत उत्तर, काय म्हणाले शिंदे?

गुवाहाटीतील हॉटेल रेडिसन्स ब्लू मध्ये गेल्या सहा दिवसांपासून असलेले एकनाथ शिंदे आज माध्यमांसमोर आले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एकप्रकारचं समाधान आणि विश्वास पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुंबईत कधी येणार ? असा प्रश्न विचारल्यानंतर शिंदे यांनीही हसून उत्तर दिलं.

Eknath Shinde : मुंबईला कधी परत येणार? पत्रकारांच्या प्रश्नाला एकनाथ शिंदेंकडून हसत हसत उत्तर, काय म्हणाले शिंदे?
एकनाथ शिंदेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 4:36 PM

मुंबई : तब्बल 9 दिवसांपासून सुरु असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय (Maharashtra Politics) नाट्य आता अंतिम टप्प्यात असल्याचं पाहायला मिळतंय. कारण, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांना समोर येऊन बोला, चर्चेतून मार्ग काढू असं आवाहन केलंय. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दिल्लीत दाखल झाले आहेत. अशावेळी गुवाहाटीतील हॉटेल रेडिसन्स ब्लू मध्ये गेल्या सहा दिवसांपासून असलेले एकनाथ शिंदे आज माध्यमांसमोर आले. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एकप्रकारचं समाधान आणि विश्वास पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुंबईत कधी येणार ? असा प्रश्न विचारल्यानंतर शिंदे यांनीही हसून उत्तर दिलं.

मुंबईला आम्ही लवकरच जातोय – शिंदे

एकनाथ शिंदे यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुंबईत कधी येणार असा प्रश्न विचारला. त्यावेळी उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईला आम्ही लवकरच जातोय. मात्र, त्याबाबत अद्याप कुठलीही तारीख निश्चित झालेली नाही, असंही शिंदे यांनी सांगितलं. इतकंच नाही तर आमच्या गटाचते प्रवक्ते दीपक केसरकर आहेत आणि वेळोवेळी ते आमची भूमिका आपल्यापर्यंत पोहोचवतील असं शिंदे यांनी स्पष्ट केलंय.

मी आजही शिवसेनेत, शिंदेंचा पुनरुच्चार

मी आजही शिवसेनेत आहे. यात शंका नाही. बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाची भूमिका घेऊन आम्ही जात आहोत, असं सांगतानाच आमची पुढची भूमिका तुम्हाला सांगत राहू. आमच्या शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर आहेत. ते तुम्हाला वेळोवेळी आमची भूमिका सांगत राहतील, असंही त्यांनी सांगितलं.

‘सगळे अगदी आनंदात आहेत’

आमदारांना पळवून नेलंय. त्यांना बंदीवान केलंय. त्यांना मारहाण केल्याचा आरोपही शिवसेनेतून केला जात होता. हा आरोप एकनाथ शिंदे यांनी खोडून काढला. या ठिकाणी 50 आमदार आले आहेत. ते खूश आहेत, आनंदात आहेत. हे सर्व लोक स्वत:च्या मर्जीने आले आहेत. स्वार्थासाठी आले नाहीत. कुणाच्याही दबावाखाली आले नाहीत. ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका पुढे घेऊन जात आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका
'आदिती यांच्या बापाच्या पापांमुळे...,' शिवसेना आमदाराची खोचक टीका.
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर
सच्चा शिवसैनिक कसा असतो ते एकनाथ शिंदे यांनी दाखवले - दीपक कसेरकर.
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी
पुढील निवडणूका बॅलेटपेपरवर घ्याव्यात, बाळासाहेब थोरात यांची मागणी.
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे
एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेने एनडीएला ताकद, काय म्हणाले बावनकुळे.
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.